मेष - चंद्र आज 30 सप्टेंबर, 2025 मंगळवार च्या दिवशी धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. अस्वास्थ्य व कटकटीचा अनुभव येईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आज संताप वाढल्याने कामे बिघडतील. व्यवहारात न्यायी राहण्याचा प्रयत्न करा. निर्धारीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल. शारीरिक थकवा व मानसिक व्यथा अनुभवाल. कार्यालयात कामाचा व्याप वाढल्याने अधिक थकवा जाणवेल. आणखी वाचा
मिथुन- आजचा दिवस आनंददायी आहे. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्यासह एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस व्यापार - व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आज आपल्या सहवासात कुटुंबियांचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शत्रूवर विजय मिळेल. चालू कामात यश मिळेल. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस नवनिर्माण व कला ह्या साठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात प्रअनुकूलता लाभेल. स्नेही व मित्र यांच्या गाठीभेटी होतील. प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर वाद किंवा मतभेद होतील. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी राहील. एखाद्या प्रवासाने मनाला आनंद मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज आपणास जर कौटुंबिक वातावरणात शांतता हवी असेल तर वाणीवर संयम ठेवावा लागेल. आपल्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखावले जाईल. आपल्या वागणुकीचा कोणास त्रास होऊ नये म्हणून म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. स्वास्थ्य बिघडेल, मन उद्विग्न होईल. आणखी वाचा
धनु - आज निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल. एखादा प्रवास संभवतो. आपली माणसे भेटल्याचा आनंद होईल. स्नेहीजनां कडील मांगलिक प्रसंगात सहभागी व्हाल. आणखी वाचा
मकर - आज मन अस्वस्थ राहील. एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. स्वकीय व मित्रांशी मतभेद होतील. धनहानी व मानहानीची शक्यता आहे. आज एखाद्या गूढ विद्येकडे आपला कल होईल. कोर्ट- कचेरीच्या कामात अपयश येईल. आणखी वाचा
कुंभ - आज आपणांस मिळणार्या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. व्यापारी वर्गाला व्यापारात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल. संतती बरोबर चांगले संबंध राहतील. प्राप्तीत वाढ होईल. आणखी वाचा
मीन -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता वाढेल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. वयस्कर व वडील यांचेकडून लाभ होईल. आणखी वाचा
Web Summary : Mixed day ahead. Gemini enjoys travel, Cancer finds business success. Virgo faces challenges, while Libra gains victory. Aquarius sees increased profits, and Pisces finds career success. Exercise caution and control speech for peace.
Web Summary : आज मिश्रित दिन है। मिथुन यात्रा का आनंद लेंगे, कर्क को व्यवसाय में सफलता मिलेगी। कन्या को चुनौतियों का सामना करना पड़ेगा, जबकि तुला को जीत मिलेगी। कुंभ को लाभ में वृद्धि होगी, और मीन को करियर में सफलता मिलेगी। शांति के लिए सावधानी बरतें और वाणी पर नियंत्रण रखें।