आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२३: बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-09-27 07:24:05 | Updated: September 27, 2023 07:24 IST

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Open in app

मेष- 27 सप्टेंबर, 2023 बुधवारी आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्नेही, स्वकीय व मित्रांसह सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागेल. वडीलधारी व स्नेहीजन ह्यांच्याशी संपर्क होऊन काही व्यवहार वाढतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. आणखी वाचा

 

वृषभ- आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात वर्चस्व राहील व आपलेपणा वाढेल. आणखी वाचा

 

मिथुन- आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था व कटकटीचा राहील. शरीराने थकाल व आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत. संततीची काळजी राहील. राजकीय अडचणी त्रास देतील. आणखी वाचा

 

कर्क- आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टाळू शकेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

 

सिंह- आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार व व्यापारी ह्यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद ह्यापासून दूर राहावे. कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही. आणखी वाचा

 

कन्या-  आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज उत्साह व स्वास्थ्य उत्तम राहील. घरी व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा

 

तूळ- आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद - विवाद, बौद्धिक चर्चा ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आज सुरू केलेले काम पूर्ण होऊ शकणार नाही. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. आणखी वाचा

 

वृश्चिक- आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्ताने घालवावा. चिंतातुर मन व अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानीची शक्यता आहे. आणखी वाचा

 

धनु- आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. आरोग्य उत्तम राहील. नशिबाची साथ लाभेल. गूढ विषयांची गोडी वाटेल. आज कार्यसिद्धीचा दिवस आहे. आणखी वाचा

 

मकर-  आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. प्रकृती साधारणच असेल. डोळ्यांचा त्रास संभवतो. आणखी वाचा

 

कुंभ- आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. मिळालेच्या भेट वस्तूंमुळे आनंदी राहाल. आणखी वाचा

 

मीन-   आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज अतीलोभ व हव्यास ह्यात आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. प्रकृती बिघडू शकते. मनाची एकाग्रता होणार नाही. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिष
Open in App