आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धन लाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-09-19 07:36:07 | Updated: September 19, 2025 07:36 IST

Daily Horoscope in Marathi: तुमचा आजचा दिवस कसा जाणार? तुमची राशीला काय आहे? वाचा आजचे राशीभविष्य....

Open in app

मेष - आज कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उद्विग्न होईल. छातीतील दुखणे किंवा इतर आजारामुळे चिंतातुर व्हाल. आर्थिक खर्चात वाढ होईल.
आणखी वाचा

वृषभ - आज आपण जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. विरोधकांवर मात करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान संभवतात. नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणखी वाचा

मिथुन - आज मनातील नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील.मनात असंतोष वाढेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वकीयांच्या सहवासामुळे मन आनंदीत होईल.
आणखी वाचा

कर्क - आज आपण भावनेच्या भरात वाहून जाल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील.  पैसा जास्त खर्च होईल.
आणखी वाचा

सिंह - आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल.
आणखी वाचा

कन्या - आज अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. संतापाच्या भरात कोणाशी वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती नरम गरम होईल.
आणखी वाचा

तूळ - आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. आर्थिक नियोजन निष्ठापूर्वक कराल. संततीकडून सुख मिळेल.
आणखी वाचा

वृश्चिक - आज नशिबाची साथ लाभेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ सुद्धा संभवतो. नोकरीत पदोन्नती संभवते.
आणखी वाचा

धनु - आज सकाळी आपणास प्रकृतीचा त्रास जाणवेल. नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम मनःस्वास्थ्यावर होईल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होईल. अचानक धन प्राप्ती संभवते. व्यवसायात लाभ होईल.
आणखी वाचा

मकर - आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल. दुपार नंतर मात्र मन व्याकुळ होईल. सरकारी कामात अडथळे येतील. अवैध कार्या पासून दूर राहावे.
आणखी वाचा

कुंभ - आजचा आपला दिवस सुखाचा व शांततेचा आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. व्यावसायिक क्षेत्रात कीर्ती होईल. वस्त्र व अलंकार ह्यासाठी पैसा खर्च होईल.
आणखी वाचा

मीन - आज आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र शक्यतो भिन्नलिंगी व्यक्तींपासून दूर राहणे हितावह होईल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो बौद्धिक चर्चा टाळा. व्यावसायिकांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
आणखी वाचा

टॅग्स :राशी भविष्यदैनिक राशीभविष्यफलज्योतिष
Open in App