Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-11-17 07:52:21 | Updated: November 17, 2025 07:52 IST

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ संभवतात. व्यवसायातील प्रगती समाधान कारक असेल. आणखी वाचा

वृषभ  - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अचानकपणे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. आरोग्यात सुधारणा होईल. आणखी वाचा

मिथुन  - आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्तीशी संबंधित व्यक्तींपासून सावध राहावे लागेल. अचानक धन खर्च होईल. आणखी वाचा

कर्क  -आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर काही ना काही कारणाने चिंतीत व्हाल. आणखी वाचा

सिंह - आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वाद टाळावे लागतील. घरातील सदस्यां बरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभ संभवतात. दुपार नंतर मात्र सावध राहावे लागेल. आणखी वाचा 

कन्या - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आपण प्रेमळ व लाभदायी संबंध प्रस्थापित करू शकाल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल. मन आनंदित राहील. आर्थिक लाभ संभवतो. आणखी वाचा

तूळ  -आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. कायद्याशी संबंधित बाबी व निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. गैरसमज दूर करावे लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

वृश्चिक - विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. प्राप्ती व व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. त्यांच्या सहवासात आपला वेळ आनंदात जाईल. दुपार नंतर मात्र स्वभावात संताप आणि उग्रपणा वाढण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा 

धनु - आज आपली कामाची योजना यशस्वीपणे पूर्ण होईल. व्यावसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. मित्रांच्या भेटीने मन प्रफुल्लित राहील. प्रवास संभवतात. धनलाभाच्या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे. आणखी वाचा 

मकर - परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशप्राप्ती संभवते. एखादा प्रवास संभवतो. कुटुंबीयांमध्ये आनंद उत्हासाचे वातावरण राहील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. धनलाभ व सामाजिक मान- सन्मान होतील. आणखी वाचा 

कुंभ  -आजचा दिवस काहीसा प्रतिकूल असल्याने नव्या कामाची सुरुवात आज न करणे हितावह राहील. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी वाद किंवा मतभेद टाळू शकाल.  आणखी वाचा

मीन - आज व्यापारी भागीदारीत आपणाला लाभ होईल. एखाद्या मनोरंजनात्मक ठिकाणी स्नेह्यांसह आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत बदल झाल्याचा अनुभव येईल. दुपार नंतर नवीन कार्यात अडचणी निर्माण होतील. आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : Daily Horoscope - November 17, 2025: Auspicious day for wealth, travel possible.

Web Summary : Aries benefits financially, family life is good for Taurus later. Gemini may face disputes, Cancer feels good. Leo gains intellectually, Virgo benefits in business. Libra needs control, Scorpio may find marriage prospects. Sagittarius sees success, Capricorn may travel abroad, Aquarius should avoid new ventures. Pisces enjoys partnerships.
टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App