Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-05-19 07:15:542026-05-19 07:25:10 | Updated: 2026-05-19 07:25:10

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष

आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम व व्यवहार करावे लागतील. इतरांशी वाद व मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. (आणखी वाचा)

वृषभ

 आज आपल्या मनाची द्विधा अवस्था आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. (आणखी वाचा)

मिथुन

चंद्र आज 19 मे, 2026 मंगळवार च्या दिवशी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर व मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल.  (आणखी वाचा)

कर्क

आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. संबंधित व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल.  (आणखी वाचा)

सिंह

 कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. (आणखी वाचा)

कन्या

सांप्रतकाली नव्या कामा संदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी व नोकरी करणार्यांना आजचा दिवस लाभदायी आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता आल्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. (आणखी वाचा)

तूळ

व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. (आणखी वाचा)

वृश्चिक

 सध्या शांत राहून वेळ घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. (आणखी वाचा)

धनु

आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांसह एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल.  (आणखी वाचा)

मकर

व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात आपण ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. आर्थिक देवाण - घेवाणीत सुद्धा यश मिळवू शकाल. (आणखी वाचा)

कुंभ

आपले विचार व बोलणे ह्यात बदल होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल.  (आणखी वाचा)

मीन

 आज आपल्यात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल. शक्यतो कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत. शरीर व मन अस्वस्थ राहील. अप्रिय घटनांतून आपले मन दुःखी होईल.  (आणखी वाचा)

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्यदैनिक राशीभविष्य
Open in App