मेष - वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात.
आणखी वाचा
वृषभ - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक लाभ संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळून काही लाभ होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
मिथुन - आज वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वाद - विवाद व बौद्धिक चर्चे पासून दूर राहावे. नव्या कार्याचा आरंभ करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
कर्क - आज ग्लानीमुळे आपले मन दुःखी राहील. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद यांचा अभाव दिसून येईल. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल.
आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य स्थळी सहलीला जाण्याचा बेत ठरवू शकाल. कार्यात यशस्वी व्हाल.
आणखी वाचा
कन्या - आज कुटुंबातआनंदाचे वातावरण राहील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे कोणाशी बौद्धिक चर्चा करणे टाळावे. प्रवास होतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
आणखी वाचा
तूळ - आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल.
आणखी वाचा
वृश्चिक - आज एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी वाद सुद्धा संभवतात. शारीरिक कष्ट व मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल.
आणखी वाचा
धनु - आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगू शकाल. उत्पन्नात वाढ संभवते. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
आणखी वाचा
मकर - आज व्यावसायिक कामात आपणाला लाभ होईल. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. अग्नी, पाणी, अचानक आपत्ती ह्यापासून मात्र सावध राहावे लागेल.
आणखी वाचा
कुंभ - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. शरीरात स्फूर्ती कमी असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही. हर्षोल्हासासाठी पैसा खर्च होईल.
आणखी वाचा
मीन - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
आणखी वाचा