आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ व कामात यश मिळेल; नोकरीत फायदा होईल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2024-03-10 07:22:41 | Updated: March 10, 2024 07:22 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष

आपल्या राशी पासून चंद्र लाभ असेल. आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारी व आदरणीय व्यक्तींचा सहवास लाभेल. आणखी वाचा

वृषभ

आपल्या राशी पासून चंद्र दशम असेल. आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल. सरकार कडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख - शांती मिळेल.  आणखी वाचा

मिथुन

आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने आपल्या कामास विलंब होईल. शरीरात स्फूर्ती व मनात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावतील. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखी वाचा

कर्क

आपल्या राशी पासून चंद्र अष्टम असेल. आज आपल्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेरील पदार्थांच्या खाण्या पिण्यामुळे आरोग्य बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल. नवे संबंध त्रासदायक ठरतील. आणखी वाचा

सिंह

आपल्या राशी पासून चंद्र सातव्या असेल. आज पती - पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कन्या

आपल्या राशी पासून चंद्र सहाव्या असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कुटुंबातील शांती - सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ व कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. आणखी वाचा

तूळ

 आपल्या राशी पासून चंद्र पाचव्या असेल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. तन व मन तरतरी व स्फूर्तीचा अनुभव घेईल. आणखी वाचा

वृश्चिक

आज शारीरिक व मानसिक दृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबीय, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही. आणखी वाचा

धनु

आपल्या राशी पासून चंद्र तिसऱ्या असेल. आज आपल्यावर गूढ व रहस्यमय विद्येचा विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास व संशोधन यांत गोडी राहील. मन शांत व प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवे काम सुरू कराल.  आणखी वाचा

मकर

आपल्या राशी पासून चंद्र दुसऱ्या असेल. आज संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. शेअर सट्टा यांत पैसे गुंतविण्याचे नियोजन कराल. आणखी वाचा

कुंभ

आपल्या राशी पासून चंद्र प्रथम असेल. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व उत्साहाचा आहे. आर्थिक दृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट व मित्र यांच्यासह रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या पर्यटनाचा बेत ठरवाल.  आणखी वाचा

मीन

आज आपल्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळे मानसिक व्यग्रता जाणवेल. मंगल कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल. कोर्ट - कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिष
Open in App