Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, २ मार्च २०२६: नशिबाची साथ लाभेल, अचानक धन प्राप्ती संभवते

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-03-02 07:34:232026-03-02 07:38:09 | Updated: 2026-03-02 07:38:09

Daily Horoscope, 2 March 2026: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?

Open in app

मेष - आज कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उद्विग्न होईल. छातीतील दुखणे किंवा इतर आजारामुळे चिंतातुर व्हाल. आर्थिक खर्चात वाढ होईल.
आणखी वाचा

वृषभ - विरोधकांवर मात करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र संघर्षमय वातावरणास सामोरे जावे लागेल. नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणखी वाचा

मिथुन - मनात असंतोष वाढेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन- लेखनात विद्यार्थ्यांचे मन लागणार नाही. दुपार नंतर मात्र मन प्रसन्न राहील.
आणखी वाचा

कर्क - आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. दुपार नंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन होईल. अवैध प्रवृत्तीमुळे मन भ्रष्ट होऊ नये ह्याकडे लक्ष द्यावे लागेल.
आणखी वाचा  

सिंह - आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल.
आणखी वाचा

कन्या - आज अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. दुपार नंतर मात्र एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतील. 
आणखी वाचा

तूळ -  घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. उच्च अधिकार्यांमुळे व्यवसायात आर्थिक लाभ होतील. 
आणखी वाचा

वृश्चिक- आज नशिबाची साथ लाभेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ सुद्धा संभवतो. नोकरीत पदोन्नती संभवते.
 आणखी वाचा

धनु - आज सकाळी आपणास प्रकृतीचा त्रास जाणवेल. नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम मनःस्वास्थ्यावर होईल. सबब वैचारिक स्तरावर संयम बाळगावा लागेल. आर्थिक चणचण भासेल. अचानक धन प्राप्ती संभवते.
आणखी वाचा

मकर - आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल. दुपार नंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल.
आणखी वाचा

कुंभ - आजचा आपला दिवस सुखाचा व शांततेचा आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. वाहनसौख्य मिळेल.
आणखी वाचा

मीन - आज आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र शक्यतो भिन्नलिंगी व्यक्तींपासून दूर राहणे हितावह होईल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो बौद्धिक चर्चा टाळा. नवीन कार्यात अडचणी येतील.
आणखी वाचा

 

English
हिंदी सारांश
Web Title : March 1, 2026 Horoscope: Luck Favors, Sudden Wealth Possible.

Web Summary : Horoscope predictions vary: Aries faces family discord, while Taurus conquers rivals. Gemini feels restless, Cancer enjoys good health initially. Scorpio benefits from luck and potential gains. Some signs may experience financial strain or discord, while others find peace and happiness.
Web Title : 1 मार्च 2026 राशिफल: भाग्य का साथ, अचानक धन प्राप्ति संभव।

Web Summary : राशिफल भविष्यवाणियाँ अलग-अलग हैं: मेष राशि वालों को पारिवारिक कलह का सामना करना पड़ेगा, जबकि वृषभ राशि वाले प्रतिद्वंद्वियों पर विजय प्राप्त करेंगे। मिथुन बेचैन महसूस करेगा, कर्क राशि वाले शुरू में अच्छे स्वास्थ्य का आनंद लेंगे। वृश्चिक को भाग्य और संभावित लाभों से लाभ होता है। कुछ राशियों को वित्तीय तनाव या कलह का अनुभव हो सकता है, जबकि अन्य को शांति और खुशी मिलेगी।
टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्यदैनिक राशीभविष्य
Open in App