आजचे राशीभविष्य, २९ जून २०२३ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, आत्मविश्वास वाढेल!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-06-29 07:22:17 | Updated: June 29, 2023 07:22 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी?

Open in app

मेष:  धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक गोष्टीत उत्साह वाटेल.  आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातम्या मिळून काही लाभ सुद्धा होईल. आणखी वाचा 

मिथुन: आज वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वाद - विवाद व बौद्धिक चर्चे पासून दूर राहावे. मानहानी संभवते. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा 

कर्क: आज ग्लानीमुळे आपले मन दुःखी राहील. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद यांचा अभाव दिसून येईल. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल. भोजन वेळेवर मिळणार नाही. निद्रानाश त्रास देईल.  आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य स्थळी सहलीला जाण्याचा बेत ठरवू शकाल.  आणखी वाचा 

कन्या: आज कुटुंबातआनंदाचे वातावरण राहील. इतरांशी गोड बोलून आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे कोणाशी बौद्धिक चर्चा करणे टाळावे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आणखी वाचा 

तूळ: आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आनंद, हर्ष व मनोरंजनावर पैसा खर्च कराल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी वाद सुद्धा संभवतात. आपल्या वक्तव्याने गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट व मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल.  आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. उत्पन्नात वाढ संभवते. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आणखी वाचा 

मकर: आज व्यावसायिक कामात आपणाला लाभ होईल. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आपणास आनंद होईल.  आणखी वाचा 

कुंभ: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. हर्षोल्हासासाठी पैसा खर्च होईल.  आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिक व शारीरिक कष्ट अधिक होतील. अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.  आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिष
Open in App