आजचे राशीभविष्य, २८ जून २०२२, मनोरंजन, प्रवास, मित्रांच्या सहवासामुळे आजचा दिवस आनंदात जाईल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-06-29 08:07:53 | Updated: June 29, 2022 08:07 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

Open in app

मेष - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील. त्यामुळे महत्त्वाच्या कार्यात अंतिम निर्णय घेणे जमणार नसल्याने आज कुठलाही निर्णय न घेणे हितावह ठरेल. आणखी वाचा 

वृषभ -  चंचल मनस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समजुतदारपणा दाखवल्यास  कोणाशी संघर्ष होणार नाही. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

मिथुन - आजचा दिवस आर्थिकदृष्टा लाभदायी आहे. स्वादिष्ट आणि रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊन, वस्त्रालंकार मिळवून तसेच मित्र आणि कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिकदृष्ट्या दिवस अत्यंत आनंददायी ठरेल.  आणखी वाचा   

कर्क -  आज मनस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्याने कोणताही महत्त्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. संबंधित व्यक्तीशी मतभेद संभवतात. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल. वाणीवर संयम ठेवा. आणखी वाचा 

सिंह -   आजचा दिवस लाभदायी आहे. स्त्रिया आणि मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्यस्थळी प्रवासाला जाल. आणखी वाचा 

कन्या -  आज नवीन कार्याची सुरुवात करण्याविषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्याबद्दल आत्मियता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रात पुढे जात राहतील. धन-मान सन्मान वाढेल.  आणखी वाचा 

तूळ -   आज आपण बुद्धिवादी आणि साहित्यप्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दुरचे प्रवास कराल. आणखी वाचा 

वृश्चिक -  आजचा दिवस सावधपणे व्यतित करावा. नवे कार्य सुरू करू नका.  क्रोध आणि अवैध आचरण आपणास अडचणीत टाकू शकतील. राजकीय अपप्रवृत्तीपासून दूर राहावे. आणखी वाचा 

धनू  -   आजचा दिवस बौद्धिक. तार्किक, विचार-विनिमय आणि लेखनकार्यासाठी अनुकूल आहे. मनोरंजन, प्रवास, मित्रांचा सहवास, भिन्नलिंगी व्यक्तीशी जवळीक यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. सार्वजनिक मानसन्मान वाढेल. आणखी वाचा 

मकर -  आजचा दिवस व्यापार व्यवसायास अनुकूल आहे. व्यापारात वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा 

कुंभ - आज कुठल्याही नव्या कामाची सुरुवात न करणे हितावह आहे. विचारात सतत बदल होत असल्याचे दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. आणखी वाचा 

मीन -   आजचा दिवस मनाविरुद्ध गोष्टी घडण्याचा आहे. त्यामुळे उत्साह मावळेल. कुटुंबात वाद संभवतात. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App