आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२२: हरवलेली वस्तू अचानक सापडेल, सिंह राशीला आर्थिक फायदा

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-07-09 07:22:41 | Updated: July 9, 2022 07:22 IST

Today's horoscope - July 9, 2022: कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या आजचं राशीभविष्य...

Open in app

मेष: आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. त्याच बरोबर सुखद प्रवासाचा आनंद व रूचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. तरीही आपले विचार व अती उत्साहाला आवर घालावा लागेल. आणखी वाचा...

वृषभ: आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. आणखी वाचा...

मिथुन: आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. जीवनसाथी व संतती ह्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. चर्चा किंवा वाद - विवाद ह्यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा...

कर्क: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

सिंह: आज आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्यासह लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास मन आनंदीत करेल. आणखी वाचा...

कन्या: कौटुंबिक सुख - शांती व आनंद ह्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे भोजन मिळेल. आणखी वाचा...

तूळ: आज आपणास आपले कला कौशल्य दाखविण्यास सुवर्ण संधी मिळेल. आपली कलात्मक व रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. मनोरंजन कार्यक्रमात मित्र व कुटुंबियांसह सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा...

वृश्चिक: आज विदेशात राहणारे स्नेही व नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा...

धनु: आर्थिक, सामाजीक व कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद आनंद घेऊ शकाल. मित्रांसह एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

मकर: आज अग्नी, पाणी व वाहन ह्यापासून एखादा अपघात संभवतो. व्यापारात कार्यमग्न राहाल. व्यापारा निमित्त प्रवास करावा लागेल व त्याचा फायदा सुद्धा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल. आणखी वाचा...

कुंभ: शारीरिक दृष्टया थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही व त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखी वाचा...

मीन: आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजात सुद्धा प्रतिकूलता जाणवेल. आणखी वाचा...

टॅग्स :राशिभविष्य २०२१
Open in App