Horoscope: आजचे राशीभविष्य, २ जुलै २०२२, दलाली, चर्चा आणि वाद यापासून दूर राहणे हितावह ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-07-02 08:35:26 | Updated: July 2, 2022 08:35 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

Open in app

मेष - आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा   

वृषभ -  आज शरीराने आणि मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्याने काल्पनिक जगाची सफर  आपण कराल. आणखी वाचा 

मिथुन -  आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनांमध्ये सुरुवातीला काही अडचणी येतील. आणखी वाचा 

कर्क -  मित्र आणि स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आणखी वाचा 

सिंह -  आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा आणि वाद यापासून दूर राहणे हितावह राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा 

कन्या -    आजचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्रीची भूमिका महत्त्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य-स्थळी जाल.  आणखी वाचा 

तूळ -  आजचा दिवस शुभ फलदाजी आहे. नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील.  वरिष्ठांसह महत्त्वाच्या चर्चेच सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. आणखी वाचा 

वृश्चिक -  आज नोकरी व्यवसायात सावधपणे काम करावे लागतील. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. आणखी वाचा 

धनू  -  आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. आजारावरील नवीन उपचारास प्रारंभ न करणे हितावह राहील. वाणी आणि वर्तन संयमित ठेवणे हिताचे राहील. आणखी वाचा 

मकर - आजचा दिवस कामाचा व्याप आणि मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र आणि संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण वाढेल आणखी वाचा 

कुंभ - आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबीयांसह दिवस चांगला जाईल. नोकरी व्यवसायात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा   

मीन -     आज आपली सृजनशक्ती अधिकच वाढेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्य विश्वाची सफर कराल. आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App