आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-07-16 07:29:23 | Updated: July 16, 2025 07:29 IST

Today's Horoscope: तुमची राशी कोणती, तुमचा आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या

Open in app

मेष : चंद्र आज 16 जुलै, 2025 बुधवारी मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आजचा दिवस अस्वास्थ्य व त्रासाचा आहे. ताप, सर्दी, खोकला ह्यांचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर संकटे कोसळतील. शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. तसेच कोणाला जामीन राहू नये. निर्णयशक्तीच्या अभावामुळे मनःस्थिती द्विधा होईल व त्यामुळे चिंता वाढतील. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या पंचमाचा स्वामी सूर्य आता चतुर्थातून भ्रमण करणार आहे. हे भ्रमण आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. ह्या भ्रमणामुळे आपल्या जीवनात प्रगती होईल. कारकिर्दीत सुद्धा यश प्राप्त होईल. व्यापारात सुद्धा लाभ होईल. एकंदरीत आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. ह्या दरम्यान वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा सामंजस्य टिकून राहील.  आणखी वाचा

वृषभ : धनवृद्धी व पदोन्नती संभवते. व्यापारी सौदे यशस्वी होतील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदाचे सुखद क्षण अनुभवू शकाल. एखादा प्रवास होऊन त्यातून काही लाभदायी नवीन संबंध प्रस्थापित होतील. आपल्या चतुर्थाचा स्वामी सूर्य आता तृतीयातून भ्रमण करणार आहे. हे भ्रमण आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. असे असले तरी ह्या दरम्यान आपणास नशिबाची साथ मिळेल. प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. कुटुंबियांशी संबंध सुधारतील. कुटुंबियांसह आपण एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. ह्या दरम्यान आरोग्य विषयक लहान - सहान समस्या उदभवू शकतात. काळजी घ्यावी. आणखी वाचा  

मिथुन : आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील. त्यामुळे आपणास जास्त प्रोत्साहन मिळेल. बढती संभवते. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. सरकारी कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. सूर्याचे हे गोचर भ्रमण आपल्या द्वितीयातून होत आहे. हे भ्रमण आपल्यासाठी उत्साह जनक आहे. ह्या दरम्यान कारकीर्दीत आपली प्रगती होईल. नशिबाची साथ सुद्धा मिळेल. ह्या दरम्यान व्यापारा निमित्त प्रवासाची संधी सुद्धा मिळेल. असे असले तरी हे दिवस आपल्यासाठी आव्हानात्मक सुद्धा होऊ शकतात. अशा वेळी आपणास सावध राहावे लागेल. आणखी वाचा

कर्क : आज नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. मंगल कार्य किंवा प्रवास ह्यावर खर्च होईल. कुटुंबीय व वरिष्ठ ह्यांच्यासह दिवस सौख्यदायी होईल. नोकरीत सुद्धा लाभ होतील. सूर्याचे भ्रमण आपल्याच राशीतून होत आहे. ह्याचा अर्थ महिनाभर सूर्य आपल्या राशीतच राहील. ह्या गोचर भ्रमणाच्या प्रभावाने हे दिवस आपल्यासाठी काहीसे आव्हानात्मक होऊ शकतात. आपल्या स्वभावात अहंकार व क्रोध हे दोन्ही बघावयास मिळू शकतात. ह्या दरम्यान वैवाहिक जोडीदार व व्यावसायिक भागीदार ह्यांच्याशी मतभेद सुद्धा होऊ शकतात. हि स्थिती टाळण्यासाठी आपणास स्वतःला सकारात्मक व्हावे लागेल. आणखी वाचा

सिंह : आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीसाठी खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. कुटुंबियांशी मतभेद होतील. अवैध कामामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे. योग्य मार्गदर्शन मिळविण्यासाठी प्रयत्न करा. सूर्याचे कर्केतील भ्रमण आपल्यासाठी चांगले आहे. आपला राशी स्वामी आपल्या व्ययातून भ्रमण करत आहे. हे भ्रमण आपल्या कारकिर्दीच्या दृष्टीने चांगले आहे. आपण यशस्वी व्हाल. परंतु व्यापारात नुकसानीस सामोरे जावे लागू शकते. ह्या व्यतिरिक्त नाते संबंधात आपणास सावध राहावे लागेल. ह्या दरम्यान आपणास आपल्या प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. आणखी वाचा

कन्या : आज दांपत्य जीवनात सुखद क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. वस्त्रे, अलंकार, वाहन इत्यादींची खरेदी होईल. भिन्नलिंगी व्यक्तीची ओळख प्रणयात परिवर्तित होईल. व्यापारात भागीदारांशी चांगले संबंध राहतील. धनलाभ होईल. सूर्याचे कर्केतील भ्रमण आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आपल्या व्यय स्थानाचा अधिपती सूर्य आता लाभ स्थानातून भ्रमण करत आहे. ह्या भ्रमणाच्या प्रभावामुळे कारकिर्दीत थोडा दबाव असू शकतो. आर्थिक दृष्ट्या सुद्धा हे दिवस आपल्यासाठी त्रासदायी होऊ शकतात. असे असले तरी कारकिर्दीत आपली प्रगती होऊ शकते. ह्या दरम्यान आपणास नाते संबंधांची काळजी घ्यावी लागेल. नात्यात अहंकार बाजूस ठेवावा. आणखी वाचा

तूळ : आज सामान्यतः प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात सफलता मिळाल्याने उत्साह वाढेल. नोकरीत लाभदायक बातमी मिळेल व सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. भिन्नलिंगी मित्रांचा सहवास घडेल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात कराल. सूर्याचे कर्केतील भ्रमण आपल्यासाठी लाभदायी आहे. आपल्या लाभस्थानाचा अधिपती सूर्य आता दशमातून भ्रमण करत आहे. ह्या दरम्यान आपला लाभ होईल. विविध स्रोतातून आर्थिक प्राप्ती सुद्धा होऊ शकते. कारकिर्दीच्या दृष्टीने सुद्धा दिवस अनुकूल आहेत. आपली प्रगती होऊ शकते. व्यावसायिक भागीदार सहकार्य करेल. वडिलांकडून सुद्धा लाभ होईल. आपले नाते संबंध सुद्धा चांगले राहतील. आणखी वाचा  

वृश्चिक : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य शक्यतो आज सुरू करू नये. आर्थिक नियोजनासाठी अनुकूलता असल्यामुळे आपल्या कष्टाचे फळ मिळेल. जुगारसदृश बाबींपासून शक्यतो दूर राहावे. प्रवास सुद्धा शक्यतो टाळावेत. सूर्याचे कर्केतील भ्रमण आपल्यासाठी काहीसे आव्हानात्मक असणार आहे. आपल्या दशमाचा स्वामी सूर्य आता नवमातून भ्रमण करत आहे, जे सामान्य फलदायी आहे. ह्या दरम्यान नोकरीत प्रगती होईल. व्यापारात नशिबाची साथ मिळेल. खर्च झाले तरी आर्थिक स्थिती चांगली असल्याने जास्त त्रास होणार नाही. ह्या दरम्यान आपणास आपल्या मेहनतीवर भरंवसा ठेवावा लागेल. नाते संबध जपावे. वैवाहिक जोडीदाराशी सामंजस्य दाखवावे. आणखी वाचा  

धनु : आज मनात औदासिन्य दिसून येईल. शारीरिक उत्साह व मानसिक तरतरी ह्यांचा अभाव असेल. कुटुंबीयांशी तणावाच्या प्रसंगामुळे घरातील वातावरण कलुषित होईल. एखादी मानहानी संभवते. वित्तहानी सुद्धा संभवते. जमीन वा वाहना संबंधीची कागदपत्रे सावधपणे तयार करा. सूर्याचे कर्केतील भ्रमण आपल्यासाठी सामान्य फलदायी असल्याचे दिसत आहे. आपल्या नवमाचा स्वामी सूर्य अष्टमातून भ्रमण करत आहे, जे विशेष शुभ फलदायी नाही. ह्या दरम्यान कारकिर्दीत समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यापारात सुद्धा नैराश्य येऊ शकते. आर्थिक दृष्ट्या सुद्धा हे दिवस विशेष असे काही असल्याचे दिसत नाही. आर्थिक नुकसान सुद्धा संभवते. नात्यातील सामंजस्य टिकवून ठेवावे, अन्यथा त्रास होऊ शकतो. प्रकृतीची काळजी घ्यावी. आणखी वाचा

मकर : आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. नोकरी, व्यापार व दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. भावंडां कडून सहकार्य मिळून लाभ सुद्धा होतील. आर्थिक लाभ संभवतात. विद्यार्थ्यांना विनासायास अभ्यास करता येईल. सूर्याचे कर्केतील भ्रमण आपल्यासाठी चांगले आहे. आपल्या अष्टमाचा स्वामी सूर्य सप्तमातून भ्रमण करत आहे. हे भ्रमण आपणास नाते संबंधात आनंद निर्माण करण्यास प्रेरित करेल. व्यापारात व नोकरीत थोडा त्रास होऊ शकतो. ह्या दरम्यान कोणाला उसने पैसे देऊ नये, अन्यथा आपला पैसा अडकू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी वाद संभवतो. तेव्हा सामंजस्य टिकवून ठेवावे. आणखी वाचा

कुंभ :आज वाद - विवाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. घरातील वातावरण कलुषित होईल. कामात अपयश आल्याने मन दुःखी होऊन नैराश्य येईल. आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. निर्णय क्षमतेचा अभाव दिसून येईल. सूर्याचे कर्केतील भ्रमण आपल्यासाठी चांगले आहे. आपल्या सप्तमाचा स्वामी षष्ठातून भ्रमण करत आहे. सूर्याचे हे भ्रमण नाते संबंधांसाठी काहीसे तणावपूर्ण होऊ शकते. ह्या दरम्यान आपल्यावर कामाचा सुद्धा दबाव राहील. व्यापारात सुद्धा अपेक्षित लाभ होणार नाही. हे लक्षात ठेवावे. अन्यथा आपणास कर्ज सुद्धा घ्यावे लागू शकते. ह्या दरम्यान आपण शत्रूंवर मात कराल. नात्यात सामंजस्य टिकवून ठेवावे. प्रकृतीच्या दृष्टीने हे दिवस विशेष चांगले नाहीत. निष्कारण काळजी करू नये. आणखी वाचा

मीन : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. उत्साह व स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस अनुकूल आहे. मित्र व कुटुंबीयांसह भोजनाचा आस्वाद घ्याल. धनलाभ संभवत असला तरी खर्च वाढणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. एखादा प्रवास संभवतो. कार्यात यशस्वी व्हाल. सूर्याचे कर्केतील भ्रमण आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. आपल्या षष्ठाचा स्वामी पंचमातून भ्रमण करत आहे. हे दिवस आपल्यासाठी चांगले आहेत. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यात आपण स्वारस्य दाखवाल. कारकिर्दीत प्रगती होईल. व्यापारात सुद्धा लाभ होईल. असे असले तरी ह्या दरम्यान नाते संबंधात तणाव जाणवू शकतो. ह्या दरम्यान कायदेशीर बाबीतून सुद्धा दिलासा मिळेल. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App