मेष - आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहेत्छुकांना यश मिळेल. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल. आणखी वाचा
मिथुन - आज प्रतिस्पर्धी व वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले असेल. आणखी वाचा
कर्क - आज अवैध व निषेधार्ह विचारां पासून दूर राहणे हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. संतती विषयक चिंता निर्माण होईल. आणखी वाचा
सिंह - आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र व संबंधितांसह हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल सुद्धा करू शकाल. सामाजिक सन्मान होतील. भागीदारांसह सकारात्मक चर्चा होईल. दुपार नंतर मानसिक नैराश्य जाणवेल. आणखी वाचा
कन्या - आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश व कीर्ती वाढेल. स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्नता जाणवेल. आणखी वाचा
तूळ - लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज हट्ट सोडणे हितावह राहील. आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. वैभवी वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. माते कडून लाभ होईल. दुपार नंतर विचारात एकदम बदल होईल. आणखी वाचा
धनु - आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील व प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. दुपार नंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल. आणखी वाचा
मकर - आज एखाद्या मंगल कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल. वाद - विवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांचे मन दुखावेल व ते आपल्यावर नाराज होतील. दुपार नंतर मनातील चिंता दूर होतील. आणखी वाचा
कुंभ - आज प्रापंचिक गोष्टीं ऐवजी गूढ विषयांकडे आपला जास्त कल होईल. नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. दुपार नंतर एखाद्या धार्मिक कार्याकडे आकर्षित व्हाल. आणखी वाचा
मीन - आज आर्थिक देवाण- घेवाण, वसुली, थकबाकी इत्यादी कार्यात व गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात सावध राहावे लागेल. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा