आजचे राशीभविष्य - २८ जानेवारी २०२३: आज आर्थिक लाभ अन् संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल; वाणीवर संयम ठेवावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-01-28 07:36:17 | Updated: January 28, 2023 07:36 IST

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष- आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. आणखी वाचा

वृषभ- आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. आणखी वाचा

मिथुन- आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. आणखी वाचा

कर्क- आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील. एखाद्या छोटया प्रवासामुळे प्रसन्नता वाढेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

सिंह- आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. राग व बोलणे ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आणखी वाचा

कन्या- आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळावे लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा

तूळ- आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. तसेच वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा

वृश्चिक- आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आरोग्य विषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर - सट्टा यात न पडणे हिताचे राहील. आणखी वाचा

धनु- आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज शरीर व मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या प्रकृती संबंधी चिंता राहील. आणखी वाचा

मकर- आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. व्यापार - व्यवसायात आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा

कुंभ- आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद - विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. कामात अल्प यश मिळेल. आणखी वाचा

मीन- आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज कोणाशीही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिष
Open in App