Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - १९ जानेवारी २०२६, प्रत्येक काम सहजपणे पार पडेल,नोकरी - व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-01-19 08:03:352026-01-19 08:03:55 | Updated: 2026-01-19 08:03:55

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. आणखी वाचा

वृषभ  - आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्‍यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल.  आणखी वाचा

मिथुन  - आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा

कर्क  - आजचा दिवस सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज - मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल. मौज - मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देईल.  आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

कन्या -  आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील. बोलताना बौद्धीक चर्चे पासून दूर राहणे हितावह राहील. आणखी वाचा 

तूळ  - आज सावध राहावे लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन व पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा 

वृश्चिक - आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्‍यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. भावंडांकडून लाभ होतील.  आणखी वाचा 

धनु - आज कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. मानसिक चंचलता व द्विधा मनःस्थिती ह्यामुळे महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. आणखी वाचा 

मकर - आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीची शक्यता असल्याने सांभाळून राहा. आणखी वाचा 

कुंभ  - आर्थिक व्यवहार तसेच जमीन - जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी.  आणखी वाचा 

मीन -  आज मित्रां कडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र व वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे स्नेह - संबंध जुळतील व भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल. आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : January 19, 2026 Horoscope: Work will be easy, prestige in job.

Web Summary : A mixed day for all zodiac signs. Some will have financial gains, while others need to be cautious in financial matters and avoid conflicts. Overall, a day requiring careful planning and execution.
Web Title : 19 जनवरी 2026 राशिफल: काम आसानी से होगा, नौकरी में प्रतिष्ठा बढ़ेगी।

Web Summary : सभी राशियों के लिए मिलाजुला दिन। कुछ को वित्तीय लाभ होगा, जबकि कुछ को वित्तीय मामलों में सावधान रहने और संघर्षों से बचने की आवश्यकता है। कुल मिलाकर, यह दिन सावधानीपूर्वक योजना और क्रियान्वयन की मांग करता है।
टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App