Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, ४ मार्च २०२६ : आज आर्थिक निर्णय विचारपूर्वकच घ्या, वरिष्ठांशी मतभेद संभवतात

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-03-04 07:43:042026-03-04 07:43:49 | Updated: 2026-03-04 07:43:49

Daily Horoscope 4 march 2026: आजचा तुमचा दिवस कसा असेल, कार्यालयात काही कटकटी होतील की, वरिष्ठांची मर्जी राहील? वाचा तुमची राशी काय सांगतेय...

Open in app

मेष - साहित्य निर्मिती व कलात्मक अभिरुची वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी आपला संघर्ष होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात.
आणखी वाचा

वृषभ - आज मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस आहे. सृजनशीलता वाढेल. हातून एखादे परोपकारी कार्य घडेल.
आणखी वाचा

मिथुन - आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. ह्या सर्वांमुळे सकाळी आपण आनंदात असाल. नशिबाची साथ लाभेल. 
आणखी वाचा

कर्क - कुटुंबियांशी वाद होतील. दुपार नंतर मात्र परिस्थितीत अनुकूल बदल होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. भावंडांकडून काही लाभ प्राप्ती होईल.
आणखी वाचा

सिंह - आज आपल्या दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावे लागेल. सरकारी कामातून फायदा होईल.
आणखी वाचा

कन्या - आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. सामाजिक मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल.
आणखी वाचा


तूळ - मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. त्यांच्याकडून एखादा फायदा संभवतो. व्यापारात लाभ होईल. वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. एखादा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
आणखी वाचा

वृश्चिक - दृढ मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज आपली सर्व कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. नोकरी - व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. मित्रांकडून सुद्धा फायदा होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर आपले विचार प्रगल्भ होतील.
आणखी वाचा

धनु - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपण सकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. एखादे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.  पदोन्नती संभवते. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
आणखी वाचा

मकर - आज सकाळी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. एखादा प्रवास संभवतो. मनःशांती लाभेल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल.
आणखी वाचा

कुंभ -  आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक जीवनात वाद होतील. हे वाद विकोपास जाऊ शकतात. आपण नवीन कामाची सुरवात करू शकाल. स्फूर्ती व प्रसन्नतेचा अभाव जाणवेल.
आणखी वाचा

मीन - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मन चिंतीत होईल. कार्यात अडचणी येऊन ती पूर्ण होण्यास विलंब होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण होतील.
आणखी वाचा 
 

English
हिंदी सारांश
Web Title : Horoscope Today, March 4, 2026: Careful financial decisions, disagreements possible.

Web Summary : Aries benefits creatively, Taurus should care for mother's health, Gemini will be successful, and Cancer may face family disputes. Leo gains confidence, Virgo must control anger, Libra needs careful financial decisions. Scorpio excels with confidence, Sagittarius may face losses, Capricorn needs peace, Aquarius may face marital discord, and Pisces may have work delays.
Web Title : आज का राशिफल, 4 मार्च 2026: सोच-समझकर आर्थिक फैसले लें, मतभेद संभव।

Web Summary : मेष राशि के जातकों के लिए रचनात्मकता का दिन, वृषभ माता के स्वास्थ्य का ध्यान रखें, मिथुन सफल होंगे, कर्क का पारिवारिक विवाद हो सकता है। सिंह को आत्मविश्वास मिलेगा, कन्या को क्रोध पर नियंत्रण रखना होगा, तुला को आर्थिक फैसले सावधानी से लेने होंगे। वृश्चिक आत्मविश्वास से आगे बढ़ेंगे, धनु को नुकसान हो सकता है, मकर को शांति चाहिए, कुंभ वैवाहिक कलह का सामना कर सकते हैं, और मीन को काम में देरी हो सकती है।
टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्य
Open in App