Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, ३ मार्च २०२६: आज सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील; तुमची राशी काय सांगतेय?

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-03-03 07:42:532026-03-03 07:44:02 | Updated: 2026-03-03 07:44:02

Daily Horoscope in marathi: तुमचा आजचा दिवस कसा असेल, घरातील वातावरण कसे राहील, खर्च होईल की धनलाभ? जाणून घ्या काय सांगते तुमची राशी?

Open in app

मेष: आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवणे हितावह राहील. मानसिक थकवा जाणवेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील. पोटाचे विकार संभवतात.
आणखी वाचा

वृषभ: आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल.
आणखी वाचा

मिथुन: प्रगतीच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. आज आपणाला काही लाभ होण्याची शक्यता आहे. 
आणखी वाचा

कर्क: आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबियांशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणा मुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. धनखर्च वाढेल. असंतोषाच्या भावनेने मन घेरले जाईल.
आणखी वाचा

सिंह: आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. उक्ती व कृतीतील उग्रपणा व अहंपणा ह्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल. सरकारी कामे जलद गतीने होतील. 
आणखी वाचा

कन्या: आज शारीरिक व मानसिक चिंता बेचैन करतील. एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. नोकर वर्गाकडून त्रास संभवतो.
आणखी वाचा

तूळ: आज कौटुंबिक जीवनात सुख व आनंद मिळेल. उत्पन्न वाढ संभवते. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात खुश राहाल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल. 
आणखी वाचा

वृश्चिक: आज आपली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. संसारात आनंद व समाधान राहील. समाजात मान - प्रतिष्ठा मिळेल. येणी वसूल होतील. 
आणखी वाचा

धनु: आज काही कारणाने आपण अडचणीत सापडाल. नोकरी - व्यवसायात त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद - विवाद केल्याने हानी होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांचा अत्यंत दक्षपणाने सामना कराव लागेल.
आणखी वाचा

मकर: आज नकारात्मक विचारां पासून दूर राहा व खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी आपली प्रशासकीय बुद्धिमत्ता दुर्लक्षित होईल. अचानक खर्च वाढेल.
आणखी वाचा

कुंभ: प्रणय, प्रेमालाप, प्रवास, पर्यटन, मनोरंजन हे आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसह भोजनासाठी बाहेर जाऊ शकाल. भागीदारांशी चांगले संबंध राहतील. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळेल.
आणखी वाचा

मीन: आज दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. सहकार्‍यांचे सहकार्य आपले व्यावसायिक काम सरळ बनवतील. मातुल घराण्या कडून लाभ होईल.
आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : Daily Horoscope, March 3, 2026: Will all your work be successful?

Web Summary : Horoscope predictions for March 3, 2026: Aries should control temper, Taurus will succeed with confidence. Gemini may face changing thoughts, Cancer may feel negativity. Leo's social standing improves, Virgo faces anxiety. Libra finds family happiness, Scorpio achieves success. Sagittarius faces job issues, Capricorn needs to watch expenses. Aquarius enjoys romance, and Pisces completes tasks smoothly.
Web Title : आज का राशिफल, 3 मार्च 2026: क्या आपके सभी कार्य सफल होंगे?

Web Summary : 3 मार्च, 2026 के लिए राशिफल: मेष राशि वालों को गुस्से पर नियंत्रण रखना चाहिए, वृषभ राशि वाले आत्मविश्वास से सफल होंगे। मिथुन राशि वालों को बदलते विचारों का सामना करना पड़ सकता है, कर्क राशि वाले नकारात्मकता महसूस कर सकते हैं। सिंह राशि का सामाजिक कद बढ़ेगा, कन्या राशि को चिंता होगी। तुला राशि को पारिवारिक सुख मिलेगा, वृश्चिक राशि सफलता प्राप्त करेगी। धनु राशि को नौकरी में समस्या होगी, मकर राशि को खर्चों पर ध्यान देना होगा। कुंभ राशि रोमांस का आनंद लेगी और मीन राशि के कार्य आसानी से पूरे होंगे।
टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्य
Open in App