Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-07-03 07:45:19 | Updated: July 3, 2025 07:45 IST

Today's Horoscope in Marathi: कोणत्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ होण्याचा योग, कोणत्या राशीच्या लोकांना जपून राहावे लागणार? जाणून घ्या

Open in app

मेष : आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. शारीरिक व मानसिक उत्साहाचा अनुभव होईल. मित्र - स्वकीयां कडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल.
आणखी वाचा 

वृषभ : वाचन - लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरी सुद्धा आपली कामातील तत्परता व कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल.
आणखी वाचा 

मिथुन : आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आई व स्त्रीयांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्याने प्रकृती बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा.
आणखी वाचा 

कर्क : आज शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र - स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ संभवतो.
आणखी वाचा 

सिंह : आजचा दिवस कुटुंबियांसह सुख शांतीत घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल.
आणखी वाचा 

कन्या : आजच्या लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील.
आणखी वाचा 

तूळ : आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत आणेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. भिन्नलिंगी आकर्षण प्रबळ होईल. 
आणखी वाचा 

वृश्चिक : आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. पत्नी व संतती कडून चांगल्या बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरी - व्यवसायात संधी मिळून उत्पन्न वाढेल. मित्रांसह सहलीला जाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल.
आणखी वाचा 

धनु : नवे काम सुरू कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन व विस्तार करू शकतील. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. गृहजीवनात आनंद व समाधान मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. आर्थिक लाभ होतील.
आणखी वाचा 

मकर : आज बौद्धिक कार्य व व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील.
आणखी वाचा 

कुंभ : राग व बोलण्यावर संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण कलुशित राहील. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल. 
आणखी वाचा 

मीन : दैनंदिन कामातून बाहेर पडून आज आपण सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहलीस जाऊ शकता. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलावंत किंवा कारागीरांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी साठी अनुकूलता लाभेल. 
आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्यदैनिक राशीभविष्य
Open in App