Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, १७ फेब्रुवारी २०२६: रागावर नियंत्रण ठेवा, अकस्मात पैसा खर्च होईल

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-02-17 07:32:442026-02-17 07:33:10 | Updated: 2026-02-17 07:33:10

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष-  चंद्र आज 17 फेब्रुवारी, 2026 मंगळवार च्या दिवशी मकर राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंदी व खेळीमेळीचे वातावरण राहील. गृहसजावटीत काही नावीन्य आणाल. घर सुशोभित करण्यासाठी व्यवस्था बदलाल. वाहनसौख्य मिळेल. सामाजिक कार्यासाठी प्रवास होतील. आणखी वाचा

वृषभ-  आज आपण व्यापार वृद्धीवर आपले लक्ष केंद्रित कराल. नवीन योजना व प्रणालीच्या वापराने व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. मात्र कामात यश मिळण्यास विलंब होईल. दुपार नंतर व्यापारातील परिस्थिती अनुकूल होईल. कामा निमित्त प्रवास करावा लागण्याची सुद्धा शक्यता आहे. पदोन्नती होईल. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे वरिष्ठ आपणावर खुश होतील. आणखी वाचा

मिथुन- आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. दुपार नंतर वैचारिक घोळ निर्माण होईल. मन बेचैन होईल. संततीच्या समस्येमुळे काळजी वाढेल. आणखी वाचा

कर्क-  आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ व भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभल्याने आपण आनंदित व्हाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील. अकस्मात पैसा खर्च होईल. भागीदारांशी मतभेद वाढतील. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा

सिंह-  आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. परदेशस्थ व्यावसायीकांमुळे लाभ संभवतात. धनवृद्धि संभवते. विचारात एकसुत्रीपणाचा अभाव जाणवेल. प्रवास होतील. अचानकपणे पैसा खर्च होईल. भागीदारांबरोबर मतभेद असले तरी परिस्थिती अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा

कन्या- आजचा दिवस सौख्यदायी आहे. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद व शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील. व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील.  आणखी वाचा

तूळ-   आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. नोकरी - व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आणखी वाचा

वृश्चिक- आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न ह्यांचे निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. परंतु दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. नोकरी - व्यवसायात यशप्राप्ती होणे अवघड होईल. कुटुंबात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. अवेळी खाणे पिणे होईल.  आणखी वाचा

धनु- आज आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. मनाची जी द्विधा स्थिती झाली होती, त्यात बदल होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल.  आणखी वाचा

मकर-  आज आपला कल धार्मिकतेकडे होईल. व्यापार - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल. मात्र, दुपार नंतर नकारात्मक विचार मनात येतील. त्यामुळे निराशा वाढेल. आणखी वाचा

कुंभ- आज धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता आहे. दुपार नंतर सर्व काही सुरळीत पार पडेल. कार्यालयात आपलाच प्रभाव असेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आणखी वाचा

मीन- आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी उत्तम फलदायी आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपार नंतर मात्र प्रत्येक काम जवाबदारीने करावे लागेल. व्यापार - व्यवसायावर सरकारी हस्तक्षेप वाढेल. कष्टाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : Today's Horoscope, February 17, 2026: Control anger, expect sudden expenses.

Web Summary : Auspicious day for Aries, focus on business growth for Taurus. Gemini may face negativity and expenses. Cancer needs anger management, while Leo sees business growth. Libra may experience family tension. Overall, caution advised regarding finances and relationships.
Web Title : आज का राशिफल, 17 फरवरी 2026: गुस्से पर काबू रखें, अचानक खर्च होगा।

Web Summary : मेष राशि के लिए शुभ दिन, वृषभ व्यापार वृद्धि पर ध्यान दें। मिथुन को नकारात्मकता और खर्चों का सामना करना पड़ सकता है। कर्क को गुस्से पर काबू रखने की जरूरत है, जबकि सिंह व्यापार में वृद्धि देखेगा। तुला पारिवारिक तनाव का अनुभव कर सकता है। कुल मिलाकर, वित्त और संबंधों के बारे में सावधानी बरतने की सलाह दी जाती है।
टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App