Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-12-05 07:01:30 | Updated: December 5, 2025 07:01 IST

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशीभविष्य

Open in app

मेष- 05 डिसेंबर, 2025 शुक्रवारी आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आज प्राप्तीत वाढ होईल. कलावंत, कारागिर ह्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल व त्यात त्यांची कदर सुद्धा केली जाईल. आणखी वाचा 

वृषभ- आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगे - सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास व स्वादिष्ट भोजन ह्यामुळे आजचा दिवस आणखीच आनंदी होईल. आर्थिक फायदा संभवतो. आणखी वाचा

मिथुन-  आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र व कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा. आपले बोलणे किंवा व्यवहार ह्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. एखादा अपघात संभवतो. आज आपला खर्च अधिक होईल. आणखी वाचा

कर्क- आजचा दिवस आपणासाठी लाभदायी आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. जोडीदार व संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संततीशी सुसंवाद साधू शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. चिंता दूर होतील. मित्रांसह एखाद्या नैसर्गिक स्थळी जाण्याची योजना आखाल. आणखी वाचा

सिंह-  आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. खंबीर मन व दृढ निश्चय ह्यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ होईल. कला व क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. धनाच्या दृष्टीने सरकारी कामे सफल होतील. आणखी वाचा

कन्या- आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांकडून काही लाभ संभवतो. आणखी वाचा

तूळ-  आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. सरकार विरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन संबंध जुळवू नये. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृश्चिक- आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंद - प्रमादात आपण व्यस्त राहाल. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल. समाजात मान - सन्मान होतील. आणखी वाचा

धनु- आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत लाभ व सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. मातुल घराण्याकडून एखादी चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. वाणीवर संयम ठेवावा लागेल.  आणखी वाचा

मकर-  आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज आपले मन चिंतातुर व द्विधा अवस्थेत राहील. अशा मनःस्थितीत आपण कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. नशिबाची साथ नसल्याने आज कोणतेही महत्वाचे काम न करणे हितावह राहील. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. वडिलधार्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखी वाचा

कुंभ- आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल. स्त्रीयांचे अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने ह्यावर पैसा खर्च होईल. मातेकडून लाभाची शक्यता आहे. जमीन, घर व वाहन इत्यादींचे व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूलता लाभेल. आणखी वाचा

मीन-  आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. जोडीदारा सोबत दिवस आनंदात जाईल. मित्रांसह छोटीशी सहल आयोजित कराल. भावंडां कडून लाभ होईल. कार्यात यश मिळेल. आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : Daily Horoscope, December 5, 2025: Avoid government opposition and anger.

Web Summary : December 5, 2025, brings mixed fortunes. Taurus benefits from joy and financial gains. Gemini faces health concerns and stress. Cancer enjoys increased income and joyful news. Libra must control speech and avoid conflicts. Other signs experience varying degrees of success and challenges.
टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App