मेष- 03 डिसेंबर, 2025 बुधवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरवात आपण स्फूर्तीने व उत्साहाने कराल. मित्र व सगे सोयरे यांच्या येण्या जाण्याने घरातील वातावरण आनंदाचे राहील. त्यांची अचानक भेट आपणास आनंदित करेल. आज आर्थिक फायदा होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवा. नवीन कामे सुरू करू शकाल. आणखी वाचा
वृषभ- आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब असल्यामुळे मन उदास बनेल. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याने आपले मन दुःखी होईल. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे नाराज व्हाल. आणखी वाचा
मिथुन- आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. आणखी वाचा
कर्क- नोकरी - व्यवसाय करण्यार्यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील व त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांशी महत्त्वपूर्ण बाबींवर मोकळेपणाने चर्चा करू शकाल. मन ताजे तवाने राहील. मातेशी चांगले संबंध राहतील. धन - मान - सन्मान मिळतील . घर सजावटीत आपण रस घ्याल. आणखी वाचा
सिंह- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. एखादा प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. पोट दुखीचा त्रास संभवतो. परदेशात राहणार्या आप्तांच्या बातम्या समजतील. वरिष्ठांशी मतभेद होतील. नोकरी - व्यवसायात अडथळे येतील. संततीची काळजी राहील. आणखी वाचा
कन्या- आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. अती उत्साह व क्रोधाचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर ताण येण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. एखादा प्रवास संभवतो. सरकार विरोधी कृतीमुळे समस्या निर्माण होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.. आणखी वाचा
तूळ- आजचा दिवस यशस्वितेचा व आनंदाचा आहे. सार्वजनिक जीवनाशी संबंधीत कार्यात यशस्वी व्हाल. आज आपल्यावर भिन्नलिंगी व्यक्तीचा प्रभाव राहील. मौजमजे साठी खर्च होईल. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. व त्यांच्या वापरासाठी संधी सुद्धा मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. उत्तम भोजन व वैवाहिक सौख्य मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक- आज कौटुंबिक शांतीचे वातावरण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकेल. नियोजित कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी व शत्रूंवर मात करू शकाल. मातुल घराण्याकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होईल. विशेष कामात खर्च होईल. आणखी वाचा
धनु- आज आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता आहे. वाड्मय किंवा अन्य सृजनशील कलेप्रती आस्था राहील. संतती विषयक चिंता राहिल्याने मन बेचैन होईल. आणखी वाचा
मकर- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्याने मनाची बेचैनी वाढेल. भोजन अवेळी होऊ शकते. शांत झोप मिळणार नाही. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आणखी वाचा
कुंभ- चिंता दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. भावंडे व स्नेही ह्यांच्याशी वैचारिक एकोपा निर्माण होईल. एखादी महत्वपूर्ण योजना आखाल. आणखी वाचा
मीन- वाद व संघर्ष टाळण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावे लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
Web Summary : Aries starts energetically with potential financial gains. Taurus may face misunderstandings. Gemini sees business growth and job promotions. Cancer enjoys career success and positive relationships. Leo experiences mixed results and health concerns. Virgo needs dietary caution. Libra finds joy and success. Scorpio achieves peace and financial benefits. Sagittarius should control anger. Capricorn faces adversity. Aquarius gains mental peace. Pisces must control spending.
Web Summary : मेष राशि वाले ऊर्जावान शुरुआत करें, वित्तीय लाभ की संभावना है। वृषभ राशि वालों को गलतफहमी हो सकती है। मिथुन राशि वालों को व्यवसाय में वृद्धि और नौकरी में पदोन्नति मिलेगी। कर्क राशि वाले करियर में सफलता और सकारात्मक संबंधों का आनंद लेंगे। सिंह राशि वालों को मिश्रित परिणाम और स्वास्थ्य संबंधी चिंताएं रहेंगी। कन्या राशि वालों को खानपान में सावधानी बरतनी चाहिए। तुला राशि वालों को खुशी और सफलता मिलेगी। वृश्चिक राशि वाले शांति और वित्तीय लाभ प्राप्त करेंगे। धनु राशि वालों को क्रोध पर नियंत्रण रखना चाहिए। मकर राशि वाले प्रतिकूल परिस्थितियों का सामना करेंगे। कुंभ राशि वालों को मानसिक शांति मिलेगी। मीन राशि वालों को खर्च पर नियंत्रण रखना होगा।