आजचे राशीभविष्य - २२ डिसेंबर २०२३, आर्थिक लाभ होण्याची शक्यता, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-12-22 07:23:37 | Updated: December 22, 2023 07:23 IST

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष

आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आणखी वाचा

वृषभ

आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास सावध राहावे लागेल. आज घडणार्‍या घटनांमुळे आपल्या काळजीत भर पडेल. आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

मिथुन

आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल आहे. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. आणखी वाचा

कर्क

आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. आणखी वाचा

सिंह

आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आपल्या हातून योग्य तोच व्यवहार घडेल. आज मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. आणखी वाचा

कन्या

आज चंद्र रास बदलून 22 डिसेंबर, 2023 शुक्रवारी मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्यास अनुकूल आहे. मात्र, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

तूळ

आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. प्रिय व्यक्तीसह प्रेमालाप होऊ शकेल. मित्रासह केलेल्या प्रवासातून आनंद मिळेल. नवीन वस्त्रालंकाराची खरेदी होऊ शकेल. आणखी वाचा

वृश्चिक

आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा होईल. आणखी वाचा

धनु

आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून, प्रवासात त्रास संभवतो. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्यांची काळजी राहील. कामे अपूर्ण राहिल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा

मकर

आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. स्फूर्तीचा अभाव जाणवेल. कुटुंबियांशी वाद होऊन मतभेद झाल्याने मन व्यथित होईल. आणखी वाचा

कुंभ

 आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी झल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा

मीन

आज चंद्र रास बदलून 22 डिसेंबर, 2023 शुक्रवारी मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिष
Open in App