Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-01-07 07:33:292026-01-07 07:42:45 | Updated: 2026-01-07 07:42:45

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app


मेष - आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रम करून सुद्धा कमी यश प्राप्त झाल्याने नैराश्य येईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आणखी वाचा

वृषभ - आज आपण प्रत्येक काम दृढ़ आत्मविश्वास व खंबीर मनोबलासह करून त्यात यश मिळवाल. वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस आनंददायी आहे. भावंडे, मित्र, शेजारी ह्यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत.  विरोधकांना नामोहरम करू शकाल. नशीबाची साथ लाभेल. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. प्रकृती ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होतील. मानसिक दृष्टीकोन नकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील. आणखी वाचा 

सिंह - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील व वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. उतावीळपणा सोडावा लागेल. काही कारणाने आपला संताप वाढेल. आणखी वाचा

कन्या - दिवसभर शारीरिक व मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोर्ट-कचेरी संबंधी कामात सावध राहावे लागेल. अचानकपणे खर्च उदभवतील. मित्रांचे गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ संभवतात. मित्रांच्या भेटी होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीला जाऊ शकाल. घरात पत्नी व संतती ह्यांच्या कडून काही सुखद बातमी मिळेल. धनप्राप्ती संभवते. प्राप्तीत वाढ होईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंद व उल्हास राहील. सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. तब्बेत उत्तम राहील. धनलाभ संभवतो. आणखी वाचा

धनु - आज प्रवासात अडचणी येतील. शरीरास थकवा जाणवेल. प्रकृती सुद्धा नरम गरम राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील. नशीबाची साथ मिळणार नाही. जोखमीच्या कामा पासून शक्यतो दूर राहावे. आणखी वाचा

मकर - आज नोकरी - व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. कार्यालयीन कामे कौशल्य पूर्वक कराल. व्यावहारिक व सामाजिक कामासाठी प्रवास करण्याची संधी मिळेल. खाणे- पिणे, हिंडणे- फिरणे ह्याकडे लक्ष राहील. अचानकपणे खर्च उदभवतील. भागीदारीत मतभेद संभवतात. गुडघेदुखीचा त्रास संभवतो. आणखी वाचा

कुंभ - आज आपणात खंबीर मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंगामुळे दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री वाढेल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल. स्वादिष्ट भोजन व नवी वस्त्रे ह्यामुळे मन प्रसन्न राहील. विवाहितांना वैवाहिक सुख चांगले मिळेल. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. दैनिक कामे सुरळीतपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वभाव उतावळा बनेल. बोलण्यात मर्यादा व वर्तनात नम्रता ठेवावी. आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : Horoscope Today: Wednesday, January 7, 2026; Auspicious day with gains likely.

Web Summary : January 7, 2026, predicts a mixed day. Leos gain confidence, while Cancer faces family discord. Gemini enjoys a pleasant day, but Taurus excels in work. Libra sees financial gains. Scorpio anticipates career advancement. However, Sagittarius may encounter obstacles. Overall, a day of varied fortunes across zodiac signs.
Web Title : आज का राशिफल: बुधवार, 7 जनवरी, 2026; शुभ दिन, लाभ की संभावना

Web Summary : 7 जनवरी, 2026 का दिन मिलाजुला रहेगा। सिंह राशि वाले आत्मविश्वास से भरे रहेंगे, जबकि कर्क राशि वालों को पारिवारिक कलह का सामना करना पड़ सकता है। मिथुन राशि वालों का दिन सुखद रहेगा, जबकि वृषभ राशि वाले काम में उत्कृष्ट प्रदर्शन करेंगे। तुला राशि वालों को वित्तीय लाभ होगा। वृश्चिक राशि वालों को करियर में उन्नति की उम्मीद है। हालांकि, धनु राशि वालों को बाधाओं का सामना करना पड़ सकता है। कुल मिलाकर, यह विभिन्न राशियों के लिए अलग-अलग भाग्य का दिन है।
टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App