आजचे राशीभविष्य : गुरुवार 27 मार्च 2025; या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, प्रिय व्यक्तीचा सहवासही घडू शकतो

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-03-27 07:33:28 | Updated: March 27, 2025 07:33 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - 27 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्नेही, स्वकीय व मित्रांसह सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागेल. वडीलधारी व स्नेहीजन ह्यांच्याशी संपर्क होऊन काही व्यवहार वाढतील. आणखी वाचा

वृषभ - 27 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील.  आणखी वाचा

मिथुन - 27 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज दिवसभर थोड्या प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्‍यांचा मंद प्रतिसाद आपला उत्साहभंग करेल. आणखी वाचा

कर्क - 27 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अवैध काम व चोरी ह्या सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

सिंह - 27 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति - पत्नी दोधांपैकी एकाची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टी पासून मन अलिप्त होईल. व्यापारीवर्गाने भागीदारांशी धैर्याने वागावे. आणखी वाचा

कन्या - 27 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख - शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा

तूळ - 27 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपण बौद्धिक कामे व चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. विनाकारण वाद - विवाद व चर्चेत पडू नका. आरोग्याच्या बाबतीत पचनक्रिये संबंधी तक्रारी राहतील. आणखी वाचा

वृश्चिक - 27 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्‍यांशी पटणार नाही व त्यामुळे मनाला वेदना होतील. आईची प्रकृती बिघडू शकते. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. जमीन, वाहन इत्यादींचे सौदे किंवा कागदपत्रे करण्या विषयी जपून राहावे.  आणखी वाचा

धनु - 27 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज एखाद्या गूढ व रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण होईल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल. आणखी वाचा

मकर -  27 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपली उक्ती व कृती यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. शेअर - सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल. प्रकृतीच्या काही तक्रारी उदभवतील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. आणखी वाचा

कुंभ - 27 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपण शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. पर्यटनाचा बेत आखाल. आणखी वाचा

मीन - 27 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहावे लागेल. एकाग्रता कमी असल्याने आपण बेचैन राहाल. मंगल कार्यावर खर्च होईल. मित्र - स्वकीयांशी मतभेद होतील. लालसा नुकसान करेल. आणखी वाचा

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App