Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य : गुरुवार २६ मार्च २०२६; आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी, व्यापार - व्यवसायात मोठा फायदा संभवतो

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-03-26 07:34:182026-03-26 07:47:24 | Updated: 2026-03-26 07:47:24

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app


मेष - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ सुद्धा कराल. शीघ्र गतीने विचारात बदल होऊन मनाची अवस्था द्विधा होईल. आज नोकरी - व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. निश्चित हेतूने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा

वृषभ - आपली अनिर्णायकी अवस्था झाल्याने हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल. मनात वैचारिक गोंधळ उडाल्याने आज आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत एखादे नवीन काम सुरू करणे हितावह ठरू शकणार नाही. आणखी वाचा

मिथुन - आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन व स्वस्थ चित्ताने होईल. मित्र व नातलगांसह सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा

कर्क - आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संबंधितांचे गैरसमज झाल्याने आपण व्यथित व्हाल. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. शक्यतो वाद टाळावेत. एखादी समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणखी वाचा 

सिंह - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी जाण्याची शक्यता आहे. मनात विचारांचे काहूर माजेल. द्विधा मनःस्थितीमुळे नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मित्र - मैत्रिणींचा सहवास घडेल व त्यांच्या कडून काही लाभ सुद्धा पदरी पडेल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. मान - सन्मान होतील. वडिलां कडून फायदा संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायात मोठा फायदा संभवतो. परदेशस्थ मित्रां कडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्या पासून दूर राहणे हितावह राहील. हातून एखादा राजद्रोह घडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस आनंददायी व समाधान मिळवून देणारा आहे. मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमालाप करू शकाल. लेखन कार्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस व्यापार - व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात - निर्यातीचा व्यापार करणार्‍यांना फायदा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस मानसिक अशांतता व उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संततीचे प्रश्न बेचैन करतील. पोटाच्या तक्रारी मुळे हैराण व्हाल. कामात अपयश आल्याने निराश व्हाल. आणखी वाचा

मीन - आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी व मानहानी होईल. नोकरीत समस्या उदभवतील. आणखी वाचा

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Daily Horoscope: March 26, 2026; Auspicious day for new ventures.

Web Summary : Mixed day for Aries, Gemini enjoys gatherings, Taurus faces indecision. Cancer feels uneasy, Leo has opportunities. Virgo benefits, Libra starts new ventures, Scorpio stays cautious. Sagittarius finds joy, Capricorn sees financial gains, Aquarius feels restless, Pisces needs care.
Web Title : आज का राशिफल: 26 मार्च, 2026; नए कार्यों के लिए शुभ दिन।

Web Summary : मेष के लिए मिलाजुला दिन, मिथुन आनंद लेंगे, वृषभ दुविधा में। कर्क को बेचैनी, सिंह को अवसर। कन्या को लाभ, तुला नए उद्यम शुरू करें, वृश्चिक सावधान रहें। धनु खुश, मकर को वित्तीय लाभ, कुंभ बेचैन, मीन को देखभाल की आवश्यकता।
टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App