Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य : रविवार २२ मार्च २०२६; प्रेमीजनांना प्रेमालापासाठी आजचा दिवस अनुकूल, धनप्राप्ती संभवते

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-03-22 07:16:532026-03-22 07:25:48 | Updated: 2026-03-22 07:25:48

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app


मेष - आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. स्त्रीयांना माहेरहून काही लाभ होऊन एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. प्रकृतीची साथ मिळणार नाही. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. आणखी वाचा

मिथुन - आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील. आणखी वाचा

कर्क - आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीय ह्यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहतील. आणखी वाचा 

सिंह - आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा

कन्या - आज 'मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. जलाशया पासून दूर राहा. खर्च खूप होईल. आणखी वाचा

तूळ - आज आपले मन मित्रांसह खाणे - पिणे, फिरावयास जाणे तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी राहील. एखादी सहल संभवते. मान - सन्मान संभवतात. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस सौख्यदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता अनुभवाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आणखी वाचा

धनु - आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील व त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. प्रेमीजनांना प्रेमालापासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. धनप्राप्ती होईल. आणखी वाचा

मकर - आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावे लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान - प्रतिष्ठेची हानी होईल. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कुंभ - आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी व भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. आणखी वाचा

मीन - आज खर्च, संताप व जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार व पैश्यांच्या देवाण - घेवाणीत सावध राहावे. कुटुंबियांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा 

English
हिंदी सारांश
Web Title : Horoscope: March 22, 2026; favorable day for lovers, financial gains likely.

Web Summary : Aries enjoys happiness and gains. Taurus faces challenges. Gemini anticipates family joy and career benefits. Cancer expects recognition. Leo attends auspicious events. Virgo needs restraint. Libra finds joy with friends. Scorpio experiences domestic bliss. Sagittarius may face travel delays but finds love and money. Capricorn encounters difficulties. Aquarius feels refreshed. Pisces should control temper and finances.
Web Title : राशिफल: 22 मार्च, 2026; प्रेमियों के लिए अनुकूल दिन, धन लाभ की संभावना।

Web Summary : मेष राशि वाले आनंद और लाभ का आनंद लें। वृषभ राशि वाले चुनौतियों का सामना करें। मिथुन राशि वाले पारिवारिक खुशी और करियर लाभ की उम्मीद करें। कर्क राशि वाले पहचान की उम्मीद करें। सिंह राशि वाले शुभ आयोजनों में भाग लें। कन्या राशि वाले संयम बरतें। तुला राशि वाले दोस्तों के साथ आनंद लें। वृश्चिक राशि वाले घरेलू सुख का अनुभव करें। धनु राशि वालों को यात्रा में देरी हो सकती है लेकिन प्यार और पैसा मिलेगा। मकर राशि वालों को कठिनाइयों का सामना करना पड़ेगा। कुंभ राशि वाले तरोताजा महसूस करेंगे। मीन राशि वालों को गुस्से और वित्त पर नियंत्रण रखना चाहिए।
टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App