आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-05-31 07:40:01 | Updated: May 31, 2025 07:40 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आज चंद्र रास बदलून 31 मे, 2025 शनिवार च्या दिवशी कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. मानसिक उदवेग दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. एखाद्या अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. आणखी वाचा

वृषभ - आज चंद्र रास बदलून 31 मे, 2025 शनिवार च्या दिवशी कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण अती संवेदनशीलतेमुळे व भावूक विचारांमुळे खूप हळवे व्हाल. आपली व इतरां विषयीची काळजी दूर झाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति व सृजनशीलतेने काम कराल. कुटुंबीय व मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. पैशा विषयी दक्ष राहून आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आणखी वाचा

मिथुन - आज चंद्र रास बदलून 31 मे, 2025 शनिवार च्या दिवशी कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज सुरवातीच्या त्रासा नंतर आपण ठरवलेली कामे पार पडतील व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे आपले कीती तरी त्रास कमी होऊ लागतील. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने तेथील वातावरण चांगले राहील. मित्र किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदात भर पडेल. कुटुंबात शांती व आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

कर्क - आज चंद्र रास बदलून 31 मे, 2025 शनिवार च्या दिवशी कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मित्र परिवार व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात चांगला जाईल. त्यांच्या कडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल. तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. काही शुभ समाचार व आर्थिक लाभ सुद्धा मिळतील. पत्नीच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आज शारीरिक व मानसिक आनंदाचा उपभोग घेऊ शकाल. आणखी वाचा 

सिंह - आज आपण कोर्ट - कचेरी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर व बेचैन असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. आपण आज हळवे व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो. काही गैरसमज होऊन आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कन्या - आज चंद्र रास बदलून 31 मे, 2025 शनिवार च्या दिवशी कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. वाडवडील व मित्र यांच्या सहवासात आपला दिवस आनंदात जाईल. प्रवास सुद्धा संभवतो. पत्नी व संतती ह्यांच्यासह वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. संतती कडून सुखद बातम्या समजतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. आणखी वाचा

तूळ - आज आपले घर व कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीची शक्यता आहे. वरिष्ठ आज आपल्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. मातुला कडून फायदा होईल. सरकारी कामात सफलता मिळेल. आणखी वाचा

वृश्चिक - आज चंद्र रास बदलून 31 मे, 2025 शनिवार च्या दिवशी कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास होईल. वरिष्ठ आज आपल्या कामगिरीवर नाखूष होतील. संततीशी मतभेद संभवतात. आज महत्वाची कामे स्थगित ठेवणे फायदेशीर ठरेल. आणखी वाचा

धनु - आज चंद्र रास बदलून 31 मे, 2025 शनिवार च्या दिवशी कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामात यश मिळण्यास विलंब झाल्याने नैराश्य येईल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये. प्रकृती भिघडण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्यावर संयम ठेवाव लागेल. खर्चात वाढ होईल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. ह्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी पैसा मिळून धन भांडारात वाढ होईल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. स्वादिष्ट भोजन, नवी वस्त्रे व वाहनसौख्य मिळेल. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस कामात यश मिळविण्यासाठी अनुकूल आहे. केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तन मनाला उत्साह जाणवेल. नोकरी - व्यवसायात अपेक्षित सहकार्य लाभेल. मातुल घरा कडून चांगली बातमी कळेल. खर्च वाढेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूलतेचा आहे. अभ्यासात यश व प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. प्रेमीजनांना परस्परांचा सहवास लाभेल. आपल्या स्वभावात जास्त हळवेपणा राहील. स्त्री स्नेह्यांसाठी खर्च होईल. आणखी वाचा

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App