Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य : शुक्रवार 28 मार्च 2025; या राशीच्या विवाहेच्छुकांना यश मिळेल, आर्थिक लाभही संभवतो

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2025-03-28 07:32:532025-03-28 07:42:30 | Updated: 2025-03-28 07:42:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष -  28 मार्च, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या लाभ असेल. आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश व कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहेच्छुकांना यश मिळेल. कौटुंबिक विरोध संभवतो. सबब मौन पाळणे सर्वोत्तम. आणखी वाचा

वृषभ - 28 मार्च, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दशम असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. नवीन कार्याच्या आयोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा

मिथुन - 28 मार्च, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्य असेल. आज प्रतिस्पर्धी व वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले असेल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक दृष्टया अनुकूलता जाणवेल. आणखी वाचा

कर्क - 28 मार्च, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टम असेल. आज अवैध व निषेधार्ह विचारां पासून दूर राहणे हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. संतती विषयक चिंता निर्माण होईल.  आणखी वाचा 

सिंह - 28 मार्च, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या असेल. आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र व संबंधितांसह हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल सुद्धा करू शकाल. सामाजिक सन्मान होतील. भागीदारांसह सकारात्मक चर्चा होईल. दुपार नंतर मानसिक नैराश्य जाणवेल. संतापाची भावना वाढेल. आणखी वाचा

कन्या - 28 मार्च, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या असेल. आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश व कीर्ती वाढेल. स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्नता जाणवेल. घरात सुखशांती नांदेल. आणखी वाचा

तूळ - 28 मार्च, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या असेल. लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा

वृश्चिक - 28 मार्च, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या चवथ्या असेल. आज हट्ट सोडणे हितावह राहील. आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. वैभवी वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. माते कडून लाभ होईल. दुपार नंतर विचारात एकदम बदल होईल. आणखी वाचा

धनु - 28 मार्च, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या असेल. आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील व प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. दुपार नंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल. मानसिक ताण राहील. स्त्री वर्गाचा प्रसाधनांवर खर्च होईल. आणखी वाचा

मकर - 28 मार्च, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या असेल. आज एखाद्या मंगल कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल. वाद - विवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांचे मन दुखावेल व ते आपल्यावर नाराज होतील. दुपार नंतर मनातील चिंता दूर होतील. मित्र व स्वजनांच्या भेटीने मन आनंदी होईल. आणखी वाचा

कुंभ - 28 मार्च, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज प्रापंचिक गोष्टीं ऐवजी गूढ विषयांकडे आपला जास्त कल होईल. नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. दुपार नंतर एखाद्या धार्मिक कार्याकडे आकर्षित व्हाल. विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात अनुकूलता लाभेल.  आणखी वाचा

मीन - 28 मार्च, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या असेल. आज आर्थिक देवाण- घेवाण, वसुली, थकबाकी इत्यादी कार्यात व गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात सावध राहावे लागेल. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो.  आणखी वाचा

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App