आजचे राशीभविष्य - 17 फेब्रुवारी 2023; आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल, नशिबाची साथ मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-02-17 07:45:54 | Updated: February 17, 2023 07:45 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... 

Open in app

मेष - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे, असे वाटत राहील. संतापामुळे नोकरी - व्यवसायात किंवा घरी मतभेद होतील. आणखी वाचा

वृषभ - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज कामाचा खूप व्याप व खाण्या - पिण्याची बेपर्वाही यामुळे आरोग्य बिघडेल. वेळेवर जेवण व झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावेत. आणखी वाचा

मिथुन - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज आपण मौज - मजा व मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी व प्रिय व्यक्तीसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सामाजिक जीवनात मान - सन्मानाचे धनी बनाल. हातून दान - धर्म व विधायक कामे होतील. आणखी वाचा

कर्क - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस खुशीचा व यशाचा आहे. कुटुंबात सुख - शांती व समाधान राहील. नोकरदारांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. नोकर वर्गाकडून व मातुल घराण्याकडून लाभ होईल. आणखी वाचा 

सिंह - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. परोपकाराचे कार्य कराल. मनाला आनंद वाटेल. आणखी वाचा

कन्या - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज आपणास प्रतिकूलतेस तोंड देण्यास तयार राहावे लागेल. आरोग्य विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधित समस्या उदभवतील. पैसा खर्च होईल. आणखी वाचा

तूळ - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज एखाद्या मांगलिक कार्या निमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. धनलाभ संभवतो. आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. नशिबाची साथ मिळेल. आणखी वाचा

वृश्चिक - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज नकारात्मक मानसिक वृत्ती टाळावी. 'मौनं सर्वार्थ साधनम्' या नीतीने वागा म्हणजे कुटुंबियांशी संघर्ष होणार नाही. आरोग्याच्या तक्रारी राहतील. आणखी वाचा

धनु - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ राहिल्यामुळे आपण उत्साही व आनंदी राहाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. आणखी वाचा

मकर - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्च देखील कराल. कोर्ट - कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येईल. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल. आणखी वाचा

कुंभ - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज नवे काम हाती घेऊ शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ होऊन अतिरिक्त प्राप्ती होईल. मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. पत्नी व संतती कडून सुख समाधान लाभेल. आणखी वाचा

मीन - आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामातील यश व वरिष्ठ अधिकार्‍यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. आणखी वाचा

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App