Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील

By ऑनलाइन लोकमत | Follow 2026-01-12 07:40:26 | Updated: January 12, 2026 07:40 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app


मेष - आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सुख - समाधान मिळेल. प्रणयाची पराकाष्ठा होईल. मौज - मस्ती व मनोरंजनामुळे सहजीवनात लाभ होईल. आणखी वाचा

वृषभ - आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाची चेष्टा - गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उदभवेल. गैरसमज निर्माण होतील. मौज - मजा, करमणूक यावर खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. एखादी दुर्घटना संभवते. आणखी वाचा

मिथुन - आज संतती व वैवाहिक जोडीदार ह्यांच्या प्रकृतीची काळजी राहील. वाद - विवाद, चर्चा ह्यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळे खर्च व नुकसान होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क -  आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. धन खर्चाची व अपयशाची शक्यता आहे. आणखी वाचा 

सिंह - आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी - पाजारी व भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. प्रगतीच्या संधी चालून येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा

कन्या -  आज मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. कुटुंबियांशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. आणखी वाचा

तूळ - सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक व सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार व आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल.  आणखी वाचा

वृश्चिक -  आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता व शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो. आणखी वाचा

धनु - आज प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टया आजचा दिवस लाभदायक आहे. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नाची साधने वाढतील. आणखी वाचा

मकर - आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाचे चीज होईल. घर, कुटुंब व संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामा निमित्त धावपळ वाढेल. नोकरीत बढती मिळेल. आणखी वाचा

कुंभ - आज आपणास अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्टया शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी वाद करणे योग्य ठरणार नाही. आणखी वाचा

मीन - आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च होईल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. आणखी वाचा

 

 

 

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : January 12, 2026 Horoscope: Libra will complete tasks confidently today.

Web Summary : Horoscope 2026 predicts mixed fortunes. Libra will be confident. Taurus faces disagreements, while Gemini should avoid arguments. Cancer may experience unrest. Leo enjoys harmony. Virgo should control negativity. Sagittarius will have a profitable day.
टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App