Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-04-26 07:26:242026-04-26 07:36:11 | Updated: 2026-04-26 07:36:11

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक अशक्तपणा जाणवेल. आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही.  आणखी वाचा

वृषभ  -  आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वास ह्यांची भूमिका महत्वाची राहील. वडील घराण्या कडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश व फायदा मिळेल. आणखी वाचा

मिथुन  - आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ होतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. भावंडे व शेजारी - पाजारी ह्यांच्याशी असलेले गैरसमज दूर होतील.  आणखी वाचा

कर्क  - आज नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. निराशा व असंतोषाची भावना होईल. कुटुंबियांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. आणखी वाचा

सिंह - आज आपला आत्मविश्वास दांडगा असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. आणखी वाचा

कन्या - आज एखाद्या व्यक्तीशी आपला वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांशी गैरसमज होतील. स्वभावात तापटपणा वाढेल. आणखी वाचा

तूळ  - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपले मन प्रफुल्लित होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीही होऊ शकते.  आणखी वाचा 

धनु - आज आपली प्रकृती नरम गरम राहील. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. शक्यतो नकारात्मक विचारां पासून दूर राहावे.  कोणतीही योजना विचारपूर्वक अंमलात आणा. आणखी वाचा

मकर - आज अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा

कुंभ  - आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल.  आणखी वाचा 

मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणा संयमित ठेवावा लागेल.  आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : Horoscope Today: April 26, 2026 - Success and Increased Respect

Web Summary : Aries needs to control temper. Taurus gains from confidence, Gemini starts new work. Cancer faces negativity, Leo gains respect. Virgo anticipates conflicts, Libra enjoys benefits. Scorpio achieves success, Sagittarius feels unwell, Capricorn sees expenses. Aquarius enjoys romance, Pisces finds peace.
Web Title : आज का राशिफल: 26 अप्रैल, 2026 - सफलता और सम्मान में वृद्धि

Web Summary : मेष को गुस्से पर नियंत्रण रखना होगा। वृषभ को आत्मविश्वास से लाभ, मिथुन नए काम शुरू करें। कर्क नकारात्मकता का सामना करें, सिंह को सम्मान मिले। कन्या को विवादों की आशंका, तुला लाभ का आनंद लें। वृश्चिक को सफलता मिले, धनु अस्वस्थ महसूस करें, मकर को खर्च दिखें। कुंभ रोमांस का आनंद लें, मीन को शांति मिले।
टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App