Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२३, स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-04-24 07:42:11 | Updated: April 24, 2023 07:42 IST

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष:  आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम व व्यवहार करावे लागतील. आणखी वाचा 

वृषभ:  आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल.  आणखी वाचा 

मिथुन:  आज आपल्या उक्ती व कृती मुळे काही अडचणी निर्माण होतील. आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील.  आणखी वाचा

कर्क:  आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. आणखी वाचा 

सिंह:  आज आपल्या दृढ आत्मविश्वास व मनोबल ह्यामुळे आपण कामात यशस्वी व्हाल. नोकरी - व्यापार व व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावीत होतील. आणखी वाचा 

कन्या:  आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्‍या नातेवाईकां कडून आनंददायी बातमी समजल्याने आपण आनंदित व्हाल. एखाद्या सहलीसाठी खर्च होईल. आणखी वाचा 

तूळ:  आज शक्यतो कोणत्याही नवीन कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. आपले वक्तव्य व वर्तन नियंत्रणात ठेवल्यास संभाव्य गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळू शकाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.  आणखी वाचा 

वृश्चिक:   आजचा दिवस आपण आनंद उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल. उत्तम भोजन व नवीन आभूषणे मिळाल्याने आपण खूप आनंदित व्हाल.  आणखी वाचा 

धनु:  आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. प्रतिस्पर्धी व शत्रूवर विजय मिळवाल.  आणखी वाचा 

मकर:  शारीरिकदृष्टया आळस, थकवा व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाराज होतील.  आणखी वाचा 

कुंभ:  आज आपणास स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. अती भावनाशीलतेमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. घर व संपत्ती संबंधित कामे सावधपणे करावीत. आई कडून लाभ होईल.  आणखी वाचा 

मीन:  आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. आपली सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार व खंबीर मन ह्यामुळे कार्य चांगल्या प्रकारे करू शकाल. मित्रांसह प्रवास - पर्यटन होऊ शकेल. भावंडांशी जवळीक वाढेल.  आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App