आजचे राशीभविष्य - २७ मार्च २०२३ - धनुसाठी आर्थिक लाभाचा तर तूळसाठी काळजीचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-03-27 07:00:17 | Updated: March 27, 2023 07:00 IST

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आणखी वाचा 

वृषभ: आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगे - सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. आणखी वाचा 

मिथुन: आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती व पत्नी ह्यांच्याकडून लाभ होईल. आणखी वाचा 

कर्क:  आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभ संभवतो. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभ संभवतो. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा 

तूळ:  आजचा दिवस शुभ फलदायी असल्याने नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व व कृती संयमित ठेवणे हितावह राहील. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा 

वृश्चिक:  आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज - मजा, मनोरंजन व एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे आज आपण खूप आनंदी राहाल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत लाभ व सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा 

मकर: आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल. शक्यतो आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आज आपणास नशिबाची साथ न मिळाल्याने आपणास नैराश्य येईल.  आणखी वाचा 

कुंभ: आज आपण अती संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन व अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर - संपत्ती किंवा वाहन ह्यांचे कागदपत्र बनवताना सावध राहावे. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक व कलात्मक शक्ती वाढेल. मित्र व कुटुंबियांसह एखाद्या प्रवासाला जाल. भावंडां कडून फायदा होईल.  आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिष
Open in App