आजचे राशीभविष्य, २७ जानेवारी २०२४ : मेषसाठी काळजीचा तर कर्कसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2024-01-27 06:58:56 | Updated: January 27, 2024 06:58 IST

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Open in app

मेष- आज कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उद्विग्न होईल. छातीतील दुखणे किंवा इतर आजारामुळे चिंतातुर व्हाल. आर्थिक खर्चात वाढ होईल. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृषभ - आज आपण जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. विरोधकांवर मात करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र संघर्षमय वातावरणास सामोरे जावे लागेल. आणखी वाचा

मिथुन-  शारीरिक व मानसिक आरोग्य समाधानकारक नसल्याने आपली चिडचिड होईल. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकणार नाही. दुपार नंतर मात्र मित्र व स्नेहीजनांच्या सहवासामुळे मनास प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा

कर्क- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मात्र कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

सिंह- आपल्या वक्तव्याने गैरसमज होण्याची किंवा एखादी व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता असल्याने आपणास संयमित राहावे लागेल. अपेक्षेहून अधिक खर्च होईल. मानसिक चिंता वाढतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

कन्या - आज अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. दुपार नंतर मात्र एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतील. आणखी वाचा

तूळ- आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते. आपली मनीषा पूर्ण होऊ शकेल. प्रिय व्यक्ती व मित्र ह्यांच्याशी संपर्क साधू शकाल. आणखी वाचा

वृश्चिक-  आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. परदेश गमनाची संधी प्राप्त होऊ शकेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. आणखी वाचा

धनु- आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. मनात नैराश्य व मरगळ असल्याने आज आपण नवीन कार्याची सुरवात करू शकणार नाही. कुटुंबियांशी वाद संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आणखी वाचा

मकर- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी आप्तेष्टांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. प्रवास संस्मरणीय होऊ शकेल. भागीदारीत फायदा होईल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. आणखी वाचा

कुंभ- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापार - व्यवसायात अनुकूल वातावरण राहून भरपूर लाभ होतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा

मीन- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी प्रकृती नरम गरम राहील. काही कारणाने अचानक खर्च करावे लागतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्यात यशस्वी होता येईल. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिष
Open in App