मेष - आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित राहण्यात मदत करेल. घरात सुखद प्रसंग घडतील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा
वृषभ - आज वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. आणखी वाचा
मिथुन- आपल्या राशी पासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील. संतती विषयक चिंता निर्माण होईल. आणखी वाचा
कर्क- आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज हातून एखादे कार्य अविचाराने होईल, तेव्हा काळजी घ्यावी. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद होईल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सकाळी आपल्या गोड बोलण्याने इतरांकडून आपली कामे करवून घ्याल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. दुपार नंतर आप्तेष्टां कडून काही लाभ संभवतो. आणखी वाचा
कन्या - आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला मोठे लाभ होतील. इतर लोकांशी असणार्या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा
तूळ- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट - कचेरी पासून शक्यतो दूर राहणे हितावह राहील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. मित्रांसाठी पैसे खर्च होतील. त्याच बरोबर त्यांच्यासह फिरण्याचा आनंद लुटू शकाल. दुपार नंतर मात्र, शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा
धनु- आजचा दिवस लाभदायी आहे. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. सरकारी कामातून लाभ होतील. अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल. आणखी वाचा
मकर- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. प्रवास संभवतो. कामा संबंधी एखादी योजना आकार घेईल. व्यापारात फायदा होईल. आणखी वाचा
कुंभ- आज आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल. कुटुंबियांशी संभाव्य वाद टाळू शकाल. दुपार नंतर मित्रांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. प्रवास संभवतो. आणखी वाचा
मीन- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. भागीदाराशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊ शकतील. दुपार नंतर मात्र, प्रकृतीत अचानकपणे काही बिघाड होईल. आणखी वाचा