आजचे राशीभविष्य २० जून २०२३: आर्थिक लाभ पण खर्चावर नियंत्रण ठेवा, प्रतिष्ठा वाढेल!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-06-20 07:42:22 | Updated: June 20, 2023 07:42 IST

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष: आज अती विचाराने मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद - विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. एखाद्या स्त्रीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अधिक वाचा

वृषभ: सुरवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. धनसंचय होऊ शकेल. अधिक वाचा

मिथुन: आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपार नंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचे वाटेल. अधिक वाचा

कर्क: नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. अधिक वाचा

सिंह: आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. कुटुंबियांच्या सहवासात रात्री भोजन घेऊ शकाल. खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. अधिक वाच

कन्या: आज सकाळची वेळ आपणास आनंददायी व लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. अधिक वाचा

तूळ: आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी - व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. अधिक वाचा

वृश्चिक: संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटेल. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. शासकीय कामे पूर्ण होतील. नोकरी - व्यवसायात अनुकूलता लाभेल. अधिक वाचा

धनु: आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत व्हाल. अधिक वाचा

मकर: आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य व मान - सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता आहे. अधिक वाचा

कुंभ: आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. सामाजिक मान - सन्मानात वाढ होईल. दुपार नंतर एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात आप्तेष्टांना सहभागी करून घेऊ शकाल. अधिक वाचा

मीन: घरातील वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. काही कारणाने आपल्यातील रागीटपणा वाढेल. अशा वेळेस आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. विरोधकांवर मात करू शकाल. अधिक वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App