मेष - विचारांच्या गतिशिलतेमुळे द्विधा मनस्थिती राहील. त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाबही. आजचा दिवस नोकरी-व्यवसायातील स्पर्धेचा राहील आणि त्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. त्यातूनसुद्धा नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा
वृषभ - द्विधा मनस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्त्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव न सोडल्यास कोणाशी चर्चेदरम्यान संघर्ष होऊ शकतो. आज आखलेला प्रवासाचा बेत पूर्ण होणार नाही किंवा रद्द करावा लागेल. आणखी वाचा
मिथुन - आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर आणि मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र आणि कुटुंबीयांसह घघरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आर्थिक लाभाची संधी आहे. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणाऱ्या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मन:स्थिती द्विधा होईल. संभाव्य वाद टाळण्यासाठी बोलण्यावर संयम ठेवा. आणखी वाचा
सिंह - कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारात अडकून पडेल. मित्रांकडून विशेषत: स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अमलात आणण्यास अनुकूल आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. पितृघऱाण्याकडून लाभ होईल, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा
तूळ - आज नोकरीच्या ठिकाण वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. लेखन आणि साहित्य निर्मिती होईल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस शांततेत आणि सावधानतेत घालवावा लागेल. नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्याने आज नवीन कामे सुरू न करणे हितावह राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकारविरोधी प्रवृत्तींपासून दूर राहणे हितावह राहील. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस आनंदात जाईल. मित्रांसह एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल. लेखनकार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भागीदारीतून फायदा होईल. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस व्यापार-व्यवसायातील प्रगती आणि आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण-घेवाणीत यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. विरोधकांचे प्रयास निष्प्रभ होतील. आणखी वाचा
कुंभ - आजचा दिवस मानसिक अशांतता आणि उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्मुळे निर्णायकता असणार नाही. कामात अपयश आल्याने निराश व्हाल. पैसा अचानक खर्च होईल. आणखी वाचा
मीन - आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी आणि मानहानी होईल. आणखी वाचा