मेष - आज चंद्र 01 ऑक्टोबर, 2025 बुधवारी धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद संभवतात. नशिबाची साथ मिळणार नाही. कामात त्वरित यश मिळणार नाही. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. वैवाहिक जीवनातील वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आणखी वाचा
वृषभ - आज आपण हळवे व्हाल व त्यामुळे आपणास बेचैनी जाणवेल. शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. व्यवसायात विघ्ने येतील. नोकरीत वरिष्ठांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी सुद्धा वाद संभवतात. आणखी वाचा
मिथुन- आज आपली मनःस्थिती मनोरंजनात्मक कार्यात सहभागी होण्याची असल्याने मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. रुचकर भोजन व उंची वस्त्रालंकार लाभतील. दुपार नंतर आपण जास्त हळवे व्हाल व त्यामुळे मनातील दुःख वाढेल. आर्थिक खर्चात वाढ होईल. अवैध कार्यापासून दूर राहा. आणखी वाचा
कर्क - आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसह सहल व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेण्याची संधी प्राप्त होईल. आणखी वाचा
सिंह - साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा
कन्या - शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. शक्यतो प्रवास टाळावेत. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या विषयी चिंता निर्माण होईल. रागावर संयम ठेवा. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करण्यास अनुकूल आहे. गूढ विद्यांचे आकर्षण निर्माण होईल. दुपार नंतर मात्र आनंद व उत्साहाचा अभाव जाणवेल. कुटुंबात कलह संभवतात. आणखी वाचा
वृश्चिक - आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. कामाचा व्याप वाढेल. दुपार नंतर मात्र मनातील मरगळ दूर होईल. मित्र आणि संबंधीतांशी सुसंवाद साधू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा
धनु - आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. दुपार नंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होतील. केलेल्या कामाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येईल. आणखी वाचा
मकर - आज आपल्या बोलण्या वागण्याने भांडण होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतापाचे प्रमाण वाढेल. मन चिंतीत राहील. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा. दुपार नंतर स्फूर्ती व उत्साह वाढेल. घरातील वातावरण शांत व आनंददायी होईल. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा
कुंभ - आजचा दिवस सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकल्याने त्यांच्या आनंदात भर पडेल. दुपार नंतर मात्र घरातील वातावरण कलुषित होईल. शरीर स्वास्थ्य बिघडेल. आपला संताप संयमित ठेवा. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस आपणास सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. हातून परोपकारी कार्य घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. वडील व वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळून त्यांच्या कडून लाभ होईल. आणखी वाचा
Web Summary : October 1, 2025, brings mixed fortunes. Cancerians may see significant financial gains, while others face challenges like potential conflicts, health concerns, and increased expenses. Focus on managing relationships and controlling spending.
Web Summary : 1 अक्टूबर, 2025 का राशिफल: कर्क राशि वालों को आर्थिक लाभ की संभावना है, जबकि अन्य को संघर्ष, स्वास्थ्य संबंधी चिंताएं और बढ़ते खर्चों का सामना करना पड़ सकता है। रिश्तों को प्रबंधित करने और खर्चों को नियंत्रित करने पर ध्यान दें।