मेष : साहित्य निर्मिती व कलात्मक अभिरुची वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. दुपार नंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी आपला संघर्ष होईल.
आणखी वाचा
वृषभ : स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस आहे.
आणखी वाचा
मिथुन : आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. ह्या सर्वांमुळे सकाळी आपण आनंदात असाल. नशिबाची साथ लाभेल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत बदल होईल.
आणखी वाचा
कर्क : आज द्विधा मनःस्थितीमुळे आपणास दीर्घकालीन योजनेचे आयोजन करताना अडचणी येतील. कुटुंबियांशी वाद होतील. दुपार नंतर मात्र परिस्थितीत अनुकूल बदल होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल.
आणखी वाचा
सिंह : आज आपल्या दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावे लागेल. सरकारी कामातून फायदा होईल.
आणखी वाचा
कन्या : आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. दुपार नंतर मात्र आत्मविश्वास वाढेल. सामाजिक मान - प्रतिष्ठेत वाढ होईल.
आणखी वाचा
तूळ : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. त्यांच्याकडून एखादा फायदा संभवतो. व्यापारात लाभ होईल. कुटुंबियांशी सौहार्दाचे संबंध राहतील. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्य नाजूक होईल.
आणखी वाचा
वृश्चिक : नोकरी - व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. नोकरीत आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खुश होतील व त्यामुळे आपल्या पदोन्नतीची शक्यता वाढेल. वडिलधार्यांशी आपले संबंध सौहार्दाचे होतील. तसेच त्यांच्या कडून एखादा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणखी वाचा
धनु : आपण सकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. एखादे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आपली कामे सहजपणे होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते.
आणखी वाचा
मकर : आज सकाळी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल.
आणखी वाचा
कुंभ : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक जीवनात वाद होतील. हे वाद विकोपास जाऊ शकतात. सांसारिक प्रश्नांविषयी आपण उदासीन व्हाल. कोर्ट - कचेरी पासून दूर राहावे. एखादी मानहानी संभवते.
आणखी वाचा
मीन : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मन चिंतीत होईल. कार्यात अडचणी येऊन ती पूर्ण होण्यास विलंब होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण होतील. सांसारिक जीवनाचा कंटाळा येईल.
आणखी वाचा