आजचे राशीभविष्य, ०७ जुलै २०२३ : कामात यश मिळेल, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-07-07 07:12:02 | Updated: July 7, 2023 07:12 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी?

Open in app

मेष: आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात व मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलघार्‍यांकडून लाभ होईल व त्यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा 

वृषभ: आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख - समाधान लाभेल. आणखी वाचा 

मिथुन: आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. आरोग्य बिघडल्याने कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी - व्यवसायात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. आणखी वाचा 

कर्क: आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अवैध काम व चोरी ह्या सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. आणखी वाचा 

सिंह: आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आपण मनोरंजन व हिंडण्या - फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीनच असेल. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास आनंददायी असणार नाही.  आणखी वाचा 

कन्या:  आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील. स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील. आणखी वाचा 

तूळ: आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण आपली कल्पनाशक्ती व सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा ह्यात भाग घेणेआपणास आवडेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल.  आणखी वाचा 

वृश्चिक: आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल. शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने आपण मानसिक दृष्टया बेचैन राहाल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. आणखी वाचा 

धनु: आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास गूढ व रहस्यमय विषयांची गोडी लागल्याने त्या विषयात खोलवर उतरण्याचा आपण प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम राहील व मन प्रसन्न राहील. आणखी वाचा 

मकर: आज 'मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. कुटुंबियांशी मतभेद होऊ नयेत म्हणून ह्याची आवश्यकता आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. स्वास्थ्य साधारण राहील.  आणखी वाचा 

कुंभ: आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक, मानसिक व आर्थिक अशा सर्व दृष्टीनी चांगला आहे. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. आणखी वाचा 

मीन: आज कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा व पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयांपासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिष
Open in App