आजचे राशीभविष्य, १७ मार्च २०२३: सुखद प्रसंग घडतील, हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-03-17 07:25:54 | Updated: March 17, 2023 07:25 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष:  आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. अस्वास्थ्य व कटकटीचा अनुभव येईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आज संताप वाढल्याने कामे बिघडतील. व्यवहारात न्यायी राहण्याचा प्रयत्न करा. निर्धारीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणखी वाचा 

 

वृषभ: आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल. शारीरिक थकवा व मानसिक व्यथा अनुभवाल. आणखी वाचा 

 

मिथुन: आजचा दिवस आनंदात व भोग विलासात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. मित्र व प्रिय व्यक्तीसह मनोरंजनात्मक प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी होईल. प्रणयक्रीडेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.  आणखी वाचा 

 

कर्क: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. सुखद प्रसंग घडतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल. नोकरीत लाभ होतील. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. आणखी वाचा 

 

सिंह: आज आपण अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आवडत्या व्यक्तीची भेट फलदायी होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील. संततीच्या दृष्टीने प्रगतीची बातमी मिळेल. अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना खूप चांगला दिवस आहे. मित्र भेटतील. आणखी वाचा 

 

कन्या: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील. स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल. घर, जमीन इ. कागदपत्रे जपून ठेवावी लागतील. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आणखी वाचा 

 

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. भावंडांशी संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी घराशी संबंधित प्रश्नांची चर्चा होईल. एखाद्या छोटया सहलीस जाण्याचे यशस्वी नियोजन कराल. धनलाभ होईल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. व्यावहारीक कारणांनी प्रवास घडेल. नव्या कामाचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा 

 

वृश्चिक: आजचा दिवस साधारणच आहे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबात वाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक त्रास व मनात मरगळ राहील. नकारात्मक विचार येतील. आणखी वाचा 


धनु: आज संततीचे सुख व स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास आजचा दिवस उत्तम आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आपल्या हातून एखादे मंगल कार्य संपन्न होईल. स्नेहीवर्ग व मित्रांच्या सहवासाने आनंद होईल. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा 

 

मकर: आज आरोग्याच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. मांगलिक कार्यावर खर्च कराल. परोपकारी व्यवहार वाढतील. शत्रूंचा त्रास होईल. डाव्या डोळ्यास त्रास होईल. आणखी वाचा 


कुंभ: आजचा दिवस मंगल कार्य व नवीन कार्य ह्यांच्या आयोजनासाठी अनुकूल आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. कौटुंबिक जीवन व दांपत्य जीवन ह्यात सुखा- समाधानाचा अनुभव येईल. आणखी वाचा 


मीन: आज आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होतील. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होऊन कुटुंबात आनंद पसरेल. सरकारकडून लाभ मिळतील. आणखी वाचा  

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App