आजचे राशीभविष्य, १६ मार्च २०२३: कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहणार, अपूर्ण कामे पूर्णत्वास जातील

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-03-16 07:14:51 | Updated: March 16, 2023 07:14 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. सरकार विरोधी कृत्यां पासून शक्यतो दूर राहा. एखादा अपघात संभवतो. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे स्वास्थ्य बिघडेल. कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. व्यवसायात त्रास संभवतो. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखी वाचा 
 

वृषभ: मित्र व स्वकीयांसह हिंडण्या - फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे व स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. दुपार नंतर मात्र प्रकृतीस काही त्रास संभवतो. खर्चात वाढ होईल. सूर्य मीनेत आल्या पासून महिनाभर आपल्या प्राप्तीत वाढ करण्यासाठी आपल्याकडे विविध मार्ग असतील. आणखी वाचा 


मिथुन: आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ संभवतात. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल. स्वकीय व मित्रांसह हिंडण्या - फिरण्याची व प्रेक्षणीय स्थळी जाण्याची संधी मिळेल. आणखी वाचा 


कर्क: आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात शांतता नांदेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साह व प्रसन्नतेचा अनुभव येईल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा 


सिंह: आज शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपार नंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बौद्धिक चर्चा टाळणे हितावह राहील. नवे कार्य हाती घेण्यात अडचणी येतील. आणखी वाचा 


कन्या: आर्थिक लाभ संभवतात. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. विरोधकांवर मात करू शकाल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक व शारीरिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईची तब्बेत बिघडेल. आणखी वाचा 


तूळ:  आज सकाळच्या प्रहरी प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबियांशी प्रेमाने वागावे लागेल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ होईल. नशिबाची साथ मिळेल. कार्यात यश प्राप्ती होईल. आणखी वाचा 


वृश्चिक: आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांच्या सहवासाचा आनंद घ्या. दुपार नंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आपल्या बोलण्याने किंवा कृतीने कुटुंबीय दुखावतील व त्यामुळे कटुता निर्माण होईल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. आणखी वाचा 


धनु: कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे आज आपली वाणी व संताप ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. आज शक्यतो शस्त्रक्रिये सारख्या बाबी टाळणे हितावह राहील. दुपार नंतर कामे यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आणखी वाचा 


मकर: आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक व आर्थिक दृष्टया काही लाभ होतील. दुपार नंतर सावध राहावे लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोरंजनासाठी खर्च होईल. संबंधितांशी मतभेद होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. आणखी वाचा 


कुंभ: आज आपला मान-सन्मान झाल्याने काही धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. मित्रांसह सहलीला जाण्याचा बेत आखाल. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. मीन संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी राहील. आणखी वाचा 


मीन: आजची सकाळची वेळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. नोकरीत वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतात. दुपार नंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळे समाधान वाटेल. आणखी वाचा  

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App