Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ३१ ऑक्टोबर २०२२ : कुंभ राशीच्या लोकांसाठी उत्तम दिवस, नोकरी-व्यवसायात लाभ होणार

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-10-31 07:11:40 | Updated: October 31, 2022 07:11 IST

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी.

Open in app

मेष: आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. अस्वास्थ्य व कटकटीचा अनुभव येईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आज संताप वाढल्याने कामे बिघडतील. व्यवहारात न्यायी राहण्याचा प्रयत्न करा. निर्धारीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणखीवाचा

वृषभ - आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल. शारीरिक थकवा व मानसिक व्यथा अनुभवाल. आणखीवाचा

मिथुन - आजचा दिवस मनोरंजन व आनंद - प्रमाद करण्याचा आहे. मित्र व कुटुंबीयांसह आनंदी वातावरणात दिवस घालवाल. सामाजिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल. आणखीवाचा

कर्कआजचा दिवस आनंददायी व यशदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ जाईल. महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील. आणखीवाचा

सिंह - आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल. संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. मित्रांचा सहवास आनंद देईल. आणखीवाचा

कन्या -  आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील. स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल. घर, जमीन इ. कागदपत्रे जपून ठेवावी लागतील. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आणखीवाचा

तूळ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. भावंडांशी संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी घराशी संबंधित प्रश्नांची चर्चा होईल. एखाद्या छोटया सहलीस जाण्याचे यशस्वी नियोजन कराल. धनलाभ होईल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. व्यावहारीक कारणांनी प्रवास घडेल. नव्या कामाचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखीवाचा

वृश्चिक - आजचा दिवस साधारणच आहे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबात वाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक त्रास व मनात मरगळ राहील. नकारात्मक विचार येतील. अवैध कार्या पासून दूर राहणे हितावह राहील. आणखीवाचा

धनु - आज संततीचे सुख व स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास आजचा दिवस उत्तम आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आपल्या हातून एखादे मंगल कार्य संपन्न होईल. स्नेहीवर्ग व मित्रांच्या सहवासाने आनंद होईल. आर्थिक लाभ होईल. आणखीवाचा

मकर - आज आरोग्याच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. मांगलिक कार्यावर खर्च कराल. परोपकारी व्यवहार वाढतील. शत्रूंचा त्रास होईल. डाव्या डोळ्यास त्रास होईल. आणखीवाचा

कुंभ - आजचा दिवस मंगल कार्य व नवीन कार्य ह्यांच्या आयोजनासाठी अनुकूल आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. कौटुंबिक जीवन व दांपत्य जीवन ह्यात सुखा- समाधानाचा अनुभव येईल. मित्रमंडळ व वडीलधार्‍यांकडून तसेच नोकरी - व्यवसायात बहुविध लाभप्राप्ती होईल.आणखीवाचा

मीनआज आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होतील. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होऊन कुटुंबात आनंद पसरेल. सरकारकडून लाभ मिळतील. आणखीवाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App