राशीभविष्य - १० डिसेंबर २०२४: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2024-12-10 07:24:28 | Updated: December 10, 2024 07:24 IST

Today Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? तुमची रास काय सांगतेय? जाणून घ्या

Open in app

मेष: 10 डिसेंबर, 2024 मंगळवार च्या दिवशी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. पारमार्थिक काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळे खर्च वाढेल. मोहाच्या प्रलोभना पासून दूर राहणे योग्य ठरेल. जमीन, घर इत्यादींच्या कागदपत्रात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आईची प्रकृती बिघडेल. आणखी वाचा 

वृषभ: आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात व व्यापार - व्यवसायात वाढ होईल. रम्य स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. त्यांच्याकडून आदर मिळेल. व्यापारात ओळख व संपर्क यांमुळे लाभ होईल. संतती व पत्नी यांच्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. आणखी वाचा 

मिथुन: आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. मान - सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. सांसारिक सुख उत्तम मिळेल. आणखी वाचा 

कर्क: आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. बढती मिळू शकते. वरिष्ठांशी महत्वपूर्ण चर्चा होतील. तसेच कुटुंबियांसह सुद्धा मनमोकळी चर्चा होईल. गृहसजावटी संदर्भात नवीन काही योजना आखाल. कामासाठी प्रवास करावा लागेल. मातुल घराण्याशी संबंध दृढ होतील. आणखी वाचा 

सिंह: आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल. नकारात्मक विचार मनात येतील, ते दूर करावे लागतील. आणखी वाचा 

कन्या: आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. यश व कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी संबंध सकारात्मक राहतील. वस्त्र, आभुषणे इत्यादींची खरेदी केल्याने खुश व्हाल. आणखी वाचा 

तूळ: आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह वेळ आनंदात घालवू शकाल. बोलण्यावर ताबा ठेवा. खर्च वाढणार नाही याकडेही लक्ष द्या. आणखी वाचा 

वृश्चिक: आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण वाद - विवादात अडकाल. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स व सट्टा ह्यात गुंतवणूक न करणे हितावह राहील. शक्य असेल तर प्रवास टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा 

धनु: आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना सावध राहावे. धनहानी व मानहानी संभवते. आणखी वाचा 

मकर: आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस मित्र - परिवारासह आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्‍यांना आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अनुकूलताच लाभेल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. स्वास्थ्य टिकून राहील. आज आर्थिक लाभ होऊ शकतात. आणखी वाचा 

कुंभ: आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी मन एकाग्र होणार नाही.  आणखी वाचा 

मीन: आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. मित्र व कुटुंबीय यांच्यासह प्रवासास जाऊ शकाल. धनप्राप्ती संभवते. आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App