Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य : रविवार २९ मार्च २०२६; नवीन कार्याची सुरवात करू शकाल, आर्थिक लाभ संभवतो

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-03-29 07:23:082026-03-29 07:41:33 | Updated: 2026-03-29 07:41:33

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app


मेष - आजचा दिवस सावध राहण्याचा असून प्रत्येक पाऊल जपूनटाकावे लागेल. एखाद्या व्यक्तीशी तीव्र मतभेद संभवतात. शारीरिक व मानसिक दृष्टया त्रस्त व्हाल. निद्रानाश झाल्यामुळे आरोग्यावर ताण येईल. आणखी वाचा

वृषभ - आज आपण भावनेच्या बंधनात गुंतण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ संभवतात. परंतु दुपार नंतर परिस्थितीत एकदम बदल होईल. खर्च वाढेल व कामात यशप्राप्ती होणे कठीण होऊन बसेल. आणखी वाचा

मिथुन - सकाळी आपले मन अशांत राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य समाधानकारक नसल्याने आपली चिडचिड होईल. वायफळ खर्च होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भावंडांशी सौहार्दता वाढेल. कामात यशस्वी व्हाल. नशिबाची साथ लाभेल. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मात्र कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता आहे. मन दुःखी होईल. आणखी वाचा 

सिंह - आपल्या वक्तव्याने गैरसमज होण्याची किंवा एखादी व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता असल्याने आपणास संयमित राहावे लागेल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. नवीन कार्याची सुरवात करू शकाल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी परिस्थिती अनुकूल राहील. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. दुपार नंतर मनःस्थिती द्विधा होईल. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. धनहानी व मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते. आपली मनीषा पूर्ण होऊ शकेल. प्रिय व्यक्ती व मित्र ह्यांच्याशी संपर्क साधू शकाल. एखादा प्रवास घडेल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. परदेश गमनाची संधी प्राप्त होऊ शकेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. आणखी वाचा

धनु - मनात नैराश्य व मरगळ असल्याने आज आपण नवीन कार्याची सुरवात करू शकणार नाही. कुटुंबियांशी वाद संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी आप्तेष्टांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. प्रवास संस्मरणीय होऊ शकेल. भागीदारीत फायदा होईल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापार - व्यवसायात अनुकूल वातावरण राहून भरपूर लाभ होतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी प्रकृती नरम गरम राहील. काही कारणाने अचानक खर्च करावे लागतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. कार्यात यशस्वी होता येईल. कीर्ती लाभ होईल. व्यापारात लाभ होतील. आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : Horoscope Today, March 29, 2026: New ventures, financial gains possible.

Web Summary : A mixed day for all zodiac signs. Some may face disagreements, while others can expect financial gains and new beginnings. Proceed cautiously, especially in the first half of the day, as circumstances may shift.
Web Title : आज का राशिफल, 29 मार्च, 2026: नए उद्यम, वित्तीय लाभ संभव।

Web Summary : सभी राशियों के लिए एक मिला-जुला दिन। कुछ को असहमति का सामना करना पड़ सकता है, जबकि कुछ को वित्तीय लाभ और नई शुरुआत की उम्मीद है। सावधानी से आगे बढ़ें, खासकर दिन के पहले भाग में, क्योंकि परिस्थितियाँ बदल सकती हैं।
टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App