मेष: आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...
वृषभ: आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास सावध राहावे लागेल. आज घडणार्या घटनांमुळे आपल्या काळजीत भर पडेल. आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नेत्र विकार संभवतात. आणखी वाचा...
मिथुन: आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल आहे. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. आणखी वाचा...
कर्क: आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता आहे. कुटुंबात महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आणखी वाचा...
सिंह: आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा...
कन्या: आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपला आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. आणखी वाचा...
तूळ: आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपले मन मित्रांसह खाणे - पिणे, फिरावयास जाणे तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी राहील. एखादी सहल संभवते. आणखी वाचा...
वृश्चिक: आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य व उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रू ह्यांच्यावर आपण मात करू शकाल. आणखी वाचा...
धनु: आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...
मकर: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. स्फूर्तीचा अभाव जाणवेल. कुटुंबियांशी वाद होऊन मतभेद झाल्याने मन व्यथित होईल. मानहानी संभवते. कोणत्याही कामात यश मिळणे अवघड होईल. आणखी वाचा...
कुंभ: आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी झल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुद्धा उत्तम राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा...
मीन: आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. वाद होण्याची शक्यता असल्याने रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा...