Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 8 सप्टेंबर 2022; कर्क राशीसाठी मौज मजेचा दिवस, तर सिंहसाठी दैनंदिन कामात अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-09-08 07:23:53 | Updated: September 8, 2022 07:23 IST

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आज घर, कुटुंब व संतती यांच्या संबंधी आपणाला आनंद व संतोषाची भावना राहील. आज आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास होऊन त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान व प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा...
 

वृषभ: आज परदेशस्थ स्नेहीजनां कडून व मित्रवर्गा कडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्याना चांगली संधी प्राप्त होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एखाद्या प्रवासामुळे मनास आनंद होईल. आणखी वाचा...


मिथुन: आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व सहकारी यांच्याशी मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृती चांगली राहणार नाही. आणखी वाचा...


कर्क: आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपण मौज - मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यांची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. आणखी वाचा...


सिंह:  आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. आणखी वाचा...


कन्या: आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. आणखी वाचा...


तूळ: आज आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. आणखी वाचा...


वृश्चिक: आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने मनाला आनंद वाटेल. आणखी वाचा...


धनु: आज द्विधा मनःस्थिती व घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही. कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा...


मकर: आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. मित्र व आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्न राहाल. आणखी वाचा...


कुंभ: आर्थिक व्यवहार तसेच जमीन - जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. आपल्या निर्णयाशी कुटुंबीय सहमत होणार नाहीत. आणखी वाचा...


मीन: आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. मंगलकार्यात हजेरी लावाल. मित्रांसह सहलीचे बेत आखाल. आणखी वाचा...      

टॅग्स :फलज्योतिष
Open in App