Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, ३१ मार्च २०२६: सरकारी कामात यश, आर्थिक लाभ; मार्चची सांगता शुभ फलदायी

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-03-31 06:42:342026-03-31 06:54:19 | Updated: 2026-03-31 06:54:19

Today Daily Horoscope 31 March 2026: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर संयम ठेवावा लागेल. अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रम करून कमी यश प्राप्त झाल्याने नैराश्य येईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. प्रवासात अडथळे येतील. सरकारी कामात मात्र यश मिळेल. आणखी वाचा 

वृषभ: आज आपण प्रत्येक काम दृढ आत्मविश्वास व खंबीर मनोबलासह करून त्यात यश मिळवाल. वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात प्रगती करू शकतील. कला व क्रीडा क्षेत्रांत कलाकारांना कसब दाखविण्याची संधी मिळेल. संतती विषयक कामावर खर्च होईल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस आनंददायी आहे. भावंडे, मित्र, शेजारी ह्यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत. मनाच्या चंचलतेमुळे विचार सतत बदलतील. मनाला स्फूर्ती लाभेल. नवीन कामाचा आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. विरोधकांना नामोहरम करू शकाल. नशिबाची साथ लाभेल. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. प्रकृती ठीक राहणार नाही. कुटुंबात मतभेद होतील. मानसिक दृष्टीकोन नकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील. सर्व प्रकारच्या अवैध बाबींपासून दूर राहणे हितावह राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील व वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान होतील. उतावीळपणा सोडावा लागेल. काही कारणाने संताप वाढेल. खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. पूर्ण दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा 

कन्या: दिवसभर शारीरिक व मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहाल. कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. अचानकपणे खर्च उद्भवतील. मित्रांचे गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. शांत चित्ताने काम करा. संतापामुळे कामात व्यत्यय येईल. मानसिक बेचैनी जाणवेल. सावध राहावे. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ संभवतात. मित्रांच्या भेटी होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीला जाऊ शकाल. घरात पत्नी व संतती ह्यांच्याकडून काही सुखद बातमी मिळेल. धनप्राप्ती संभवते. प्राप्तीत वाढ होईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. एखाद्या स्त्रीमुळे फायदा होईल. मनासारखे वैवाहिक सौख्य उपभोगू शकाल. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंद व उल्हास राहील. सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. तब्बेत उत्तम राहील. धनलाभ संभवतो. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. मित्र व संबंधितांकडून लाभ होतील. संततीची समाधानकारक प्रगती होईल. आणखी वाचा 

धनु: आज प्रवासात अडचणी येतील. शरीरास थकवा जाणवेल. प्रकृती नरम गरम राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील. नशिबाची साथ मिळणार नाही. जोखमीच्या कामापासून शक्यतो दूर राहावे. कार्य साफल्य होणे कठीण आहे. वरिष्ठांशी संघर्ष होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. आणखी वाचा 

मकर:  आज नोकरी - व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. कार्यालयीन कामे कौशल्यपूर्वक कराल. व्यावहारिक व सामाजिक कामासाठी प्रवास करण्याची संधी मिळेल. खाणे- पिणे, हिंडणे- फिरणे ह्याकडे लक्ष राहील. अचानकपणे खर्च उद्भवतील. भागीदारीत मतभेद संभवतात. संताप व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. नवीन काम सुरू करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. आणखी वाचा 

कुंभ: आज आपणात खंबीर मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. दिवस आनंदात जाईल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल. स्वादिष्ट भोजन व नवी वस्त्रे ह्यामुळे मन प्रसन्न राहील. विवाहितांना वैवाहिक सुख चांगले मिळेल. सामाजिक मान - सन्मानात वाढ होईल. वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. दैनिक कामे सुरळीतपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वभाव उतावळा बनेल. बोलण्यात मर्यादा व वर्तनात नम्रता ठेवावी. एखादी चांगली बातमी मिळेल. सहकारी व नोकरांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा 

 

English
हिंदी सारांश
Web Title : March 31, 2026 Horoscope: Success in work, financial gains.

Web Summary : Mixed day. Aries: Control temper. Taurus: Financial gains. Gemini: Favorable day. Cancer: Health issues. Leo: Success in work. Virgo: Mental stress. Libra: Monetary gains. Scorpio: Promotion possible. Sagittarius: Travel issues. Capricorn: Favorable day for work. Aquarius: Enjoyable day. Pisces: Good news expected.
Web Title : 31 मार्च 2026 राशिफल: सरकारी काम में सफलता, आर्थिक लाभ।

Web Summary : मिलाजुला दिन। मेष: गुस्से पर नियंत्रण रखें। वृषभ: वित्तीय लाभ। मिथुन: अनुकूल दिन। कर्क: स्वास्थ्य संबंधी समस्याएं। सिंह: काम में सफलता। कन्या: मानसिक तनाव। तुला: धन लाभ। वृश्चिक: पदोन्नति संभव। धनु: यात्रा संबंधी समस्याएं। मकर: काम के लिए अनुकूल दिन। कुंभ: सुखद दिन। मीन: शुभ समाचार अपेक्षित।
टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्यमहावीर जयंतीअध्यात्मिक
Open in App