आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२३: मित्रांकडून फायदा, धनलाभाचे योग; आनंद साजरा करायचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-10-30 06:53:05 | Updated: October 30, 2023 06:53 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आजच्या दिवसाचा प्रारंभ स्फूर्ती व उत्साहाने होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र व आप्तेष्टांची भेट होईल. दुपारनंतर कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. इतरांशी बोलताना वाणी संयमित ठेवावी. कुटुंब, आप्तेष्ट व कामाच्या ठिकाणी संबंधातील सौहार्दता टिकून राहण्यासाठी स्फूर्ती व उत्साह ह्यात संतुलन ठेवावे लागेल. आणखी वाचा 

वृषभ: द्विधा मनःस्थितीमुळे आपण असमाधानी राहाल. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल. स्वकीयांशी दुरावा संभवतो. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. कामाचा उत्साह येईल. आर्थिक लाभ होतील. आप्तेष्टांचा सहवास घडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरगुती वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा 

मिथुन: आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवासाचे व सहलीचे नियोजन करू शकाल. सरकारी कामातून फायदा होईल. दुपारनंतर थोडे सावध राहावयास लागेल. इतरांच्या भानगडीत पडू नका. शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावेत. आणखी वाचा 

कर्क:   आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. मित्र भेटीने आपण आनंदित व्हाल. त्यांच्यासह एखाद्या सहलीचे नियोजन करू शकाल. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा 

सिंह: दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापाने इतरांची मने दुखवाल. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. आणखी वाचा 

कन्या: इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील. दुपारनंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. आणखी वाचा 

तूळ: आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दुपारनंतर कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शक्यतो प्रवास टाळावेत. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार - व्यवसायात आपण व्यस्त राहाल व त्यातून लाभ होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण - घेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन समाधानाचे राहील. सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा गौरव होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद उपभोगू शकाल. वाहनसौख्य लाभेल. आणखी वाचा 

धनु: आजच्या दिवसाची सुरवात थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपारनंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आप्तेष्टांसह दिवस आनंदात घालवू शकाल. आर्थिक लाभ झाल्याने भविष्यासाठी काही तरतूद कराल. आपल्या हातून एखादे सत्कार्य घडेल. आणखी वाचा 

मकर: आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शासकीय विषयात यशस्वी होऊ शकाल. शक्यतो प्रवास टाळावेत. आणखी वाचा 

कुंभ: आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. लेखन कार्य करू शकाल. इतरांच्या वागण्या बोलण्याने आपले मन दुखावले जाऊ शकते. वैचारिक गोंधळामुळे आज संपत्ती संबंधित कोणताही व्यवहार न करणे हितावह राहील. आणखी वाचा 

मीन: आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. कामासाठी एखादा प्रवास संभवतो. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. आणखी वाचा 

 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App